Sambhajinagar News : लोकप्रतिनिधींच्या निधीतील कामांच्या एनओसीला आता ३ महिन्यांचीच वैधता; सभापतींचा निर्णय

शहरात आमदार, खासदारांना त्यांच्या निधीतून काम करण्यासाठी महापालिकेकडून ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) घ्यावी लागते, परंतु अनेक कंत्राटदार एनओसी घेऊनही वर्षानुवर्षे काम सुरूच करीत नाही.
Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation
Chhatrapati Sambhajinagar Municipal CorporationFile Photo
Published on
Updated on

Now validity of NOC for works in People's Fund is 3 months only; Decision of the Speaker

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहरात आमदार, खासदारांना त्यांच्या निधीतून काम करण्यासाठी महापालिकेकडून ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) घ्यावी लागते, परंतु अनेक कंत्राटदार एनओसी घेऊनही वर्षानुवर्षे काम सुरूच करीत नाही. त्यामुळे नागरिक आम्हाला धारेवर धरतात, अशी ओरड सोमवारी (दि.६) स्थायी समिती सभेत भाजप सदस्यांनी केली. त्यावर प्रत्येक कामाच्या एनओसीची वैधता ही ३ महिनेच गृहित धरावी. त्यानंतर नव्याने एनओसी घ्यावी लागेल, असे आदेश सभापती अनिल मकरिये यांनी दिले.

Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation
Sambhajinagar News : खोदलेल्या रस्त्यांवरील पॅचवर्कसाठी महापालिकेचे कंत्राटदारांना आदेश

शहरात आमदार, खासदार यांच्या निधीतून आणि शासनाच्या विविध योजनांच्या निधीतून काम करण्यासाठी महापालिकेची एनओसीची आवश्यकता असते. हे काम सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात येते. त्यामुळे महापालिका हद्दीत नेमकी कोणती कामे कधी झाली, जी कामे आमदार, खासदार निधी अथवा दलित वस्ती सुधार निधीसह डीपीसीतून करण्यासाठी मंजुरी घेण्यात येत आहे, तीच कामे महापालिका निधीतून मंजूर होऊन सुरू असतील तर एकाच कामावर दुसऱ्यादा निधी खर्च होऊ नये यासाठी एनओसी घेणे आवश्यक असते. दरम्यान,शासनाच्या विविध योजनांतून महापालिका हद्दीत कामे केली जातात. याशिवाय लोकप्रतिनिधीच्या निधीतूनही कामे होतात.

या सर्व कामांना एनओसी आवश्यक असते. त्यासाठी प्रत्येक वर्षी मोठ्या प्रमाणात महापालिकेकडे एनओसीसाठी प्रस्ताव महापालिकेकडे सादर केले जातात. वर्षाला किमान शेकडो कामांच्या एनओसीचे प्रस्ताव मंजूर होऊन कामाविनाच पडून असतात. काम मंजूर असल्याने ती मनपाच्या निधीतून पुन्हा मंजूर होत नाही. त्यामुळे नगरसेवकांना वॉर्डातील नागरिकांच्या संतापाला सामोरे जावे लागते. हा मुद्दा सोमवारी झालेल्या महापालिकेच्या स्थायी समितीत चर्चेला आला. त्यावर सभापती अनिल मकरिये यांनी हे आदेश दिले.

Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation
Beed News : वर्क ऑर्डर होऊनही तीन महिने उलटले; रस्ता-नालीचे काम रखडले

अनेक कामे निकृष्ट

आमदार, खासदार निधीतून रस्ते, ड्रेनेज, सभागृह बांधणे यासह विविध कामे केली जातात. ही कामे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत केली जातात. ते काम मनपाचे की लोकप्रतिनिधींच्या निधीतील यावरच हेच कळत नाही. मात्र जेव्हा थातून मातूर काम होते. तेव्हाच काळते की हे काम लोकप्रतिनिधींच्या निधीतील आहे. काही वेळा तर काम मनपाचे अन् एनओसी लोकप्रतिनिधीची, असेही घडल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे तत्कालीन आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी एनओसीवर लगाम लावला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news