Sambhajinagar Crime : कुख्यात गुंड टिप्याची पाच वर्षांपूर्वीच्या गुन्ह्यात हर्सूल जेलमध्ये रवानगी

न्यायालयात तारखेला झाला होता हजर; लूटमार करून महिनाभरापासून पोलिसांना गुंगारा
Sambhajinagar Crime
Sambhajinagar Crime : कुख्यात गुंड टिप्याची पाच वर्षांपूर्वीच्या गुन्ह्यात हर्सूल जेलमध्ये रवानगी File Photo
Published on
Updated on

Notorious gangster Tipu sent to Harsul jail for a crime committed five years ago

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: जेलमधून बाहेर पडताच कुख्यात गुंड जावेद शेख ऊर्फ टिप्या आणि गंगने प्लॉटिंग व्यवसायिकाला तलवार लावून २ ऑगस्टला अडीच लाखांची रोकड लुटली होती. तेव्हापासून टिप्या पोलिसांना गुंगारा देत होता.

Sambhajinagar Crime
Sambhajinagar Crime : मुख्य संपादकासह संपादकावर खंडणीचा गुन्हा दाखल

दरम्यान, २०२१ साली महिलेसह, सहायक फौजदारच्या अंगावर गाडी घालून जिवे मारण्याच्या प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात तो न्यायालयात तारखेला गुरुवारी (दि.४) हजर झाला. त्याची न्यायालयाने १६ सप्टेंबरपर्यंत हर्मूल कारागृहात न्यायालयीन कोठडीत रवानगी केली असल्याचे पोलिस निरीक्षक अशोक भंडारे यांनी सांगितले.

अधिक माहितीनुसार, फिर्यादी शेख अजर शेख गणी (४०, रा. गारखेडा) हे २ ऑगस्टला रात्री मित्र अब्रार सोबत बायपास भागातील हॉटेलमध्ये गेले. तेव्हा तिथे टिप्याने दोघांना बाहेर पडताच सोबत नेले. टोळीतील टग्या, बादशहा अर्जुन आणि भूषण टिप्याचे साथीदार तिथे आले. टिप्याने तलवार अजरच्या पोटाजवळ लावून खिशातील अडीच लाख रुपये काढून घेतले. सकाळी आणखी एक लाख दिले नाही तर मर्डर करील, अशी धमकीही दिली होती. त्यानंतर पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. अधिक तपास उपनिरीक्षक विनोद भालेराव करत आहेत.

Sambhajinagar Crime
सातारा गॅझेट महिनाभरात लागू न झाल्यास पुढच्या निवडणुकीत धुरळा उडवू : जरांगे

गुंड टिप्या व गंगने व्यावसायिकाला लुटून पळ काढला होता. पुंडलिकनगर पोलिसांनी टोळीतील आकाश मगरे ऊर्फ टग्या, भूषण गवळी, शेख बादशहाला काही दिवसांपूर्वीच बेड्या ठोकल्या होत्या. तर अभिषेक मोरेला गुन्हे शाखेने पकडले होते. मात्र, टिप्याला पोलिस पकडू शकले नाही. तो स्वतःच दुसऱ्यांदा न्यायालयात हजर झाला. तारखेला हजर होऊन निसटून जाईल, असा विचार करून तो आला मात्र न्यायालयानेही त्याची हसूल जेलला रवानगी केल्याने टिप्या पुरता अडकला आहे.

धिंड काढत असल्याने भीती

शहरात पोलिसांकडून गुन्-हेगारांची धिंड काढली जात आहे. कुख्यात तेजा, अमली पदार्थ तस्करीतील आरोपी तसेच सिडकोत जीवघेणा हल्ला करणारा गुंड मुळे यांची पोलिसांनी त्यांच्याच भागात धिंड काढून दहशत मोडीत काढली. यामुळे गुन्हेगारांमध्ये भीती निर्माण झाली आहे. त्या धाकानेच महिनाभरापासून गुंगारा देणारा टिप्या थेट न्यायालयात हजर झाला, असे सूत्रांनी सांगितले.

तेव्हा एन्काऊंटरच्या भीतीने आला होता शरण

शिवाजीनगर भागात सप्टेंबर २०२१ रोजी सुरक्षारक्षक महिलेसह सहायक फौजदाराच्या अंगावर गाडी घालत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्यानंतर दुसऱ्या दिवशी कुख्यात गुन्हेगार टिप्याने कारागृह पोलिसाला मित्र व मैत्रिणीच्या मदतीने लुटून पसार झाला होता. तेव्हा पोलिसांनी नातेवाइकांना टिप्याला हजर करा, असा सज्जड दम भरला होता. पोलिसांना सापडल्यास आता त्याचे थेट एन्काऊंटरच करणार असल्याचा निरोप देताच तो तेव्हाही भीतीने न्यायालयासमोर हजर झाला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news