Chhatrapati Sambhajinagar : मोंढ्यात पाडापाडीने व्यापारी धास्तावले

५० दुकानदारांना नोटीस, धोकादायकसह अनधिकृत इमारतींवर कारवाई
Chhatrapati Sambhajinagar
Chhatrapati Sambhajinagar : मोंढ्यात पाडापाडीने व्यापारी धास्तावलेFile Photo
Published on
Updated on

Notices issued to 50 shopkeepers, action taken against dangerous and unauthorized buildings at Mondha

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहराच्या विकास आराखड्यातील प्रमुख रस्त्यांच्या रुंदीकरणासह सर्व्हिस रोडसाठी महापालिकेने विशेष मोहीम हाती घेतली आहे. यात मोहिमेअंतर्गत जुन्या मोंढ्यातील व्यापाऱ्यांना महापालिकेने दुकाने व इमारती पाडापाडीच्या नोटीस बजावल्या आहेत. यात काहींना धोकादायक म्हणून तर काहींना अनधिकृत वाढीव बांधकाम असल्याने कारवाईचा इशारा दिला आहे. त्यामुळे ५० हून अधिक धास्तावलेले व्यापारी न्यायालयात धाव घेण्याच्या तयारीत आहेत.

Chhatrapati Sambhajinagar
Vaijapur Credit Society Scam | वैजापुरातील साईबाबा महिला नागरी पतसंस्थेत कोट्यवधींचा घोटाळा उघड

महापालिकेने शहरातील प्रमुख रस्त्यांचा श्वास मोकळा करण्याची कारवाई सुरू केली आहे. या मोहिमेत बीड बायपास रस्ता, रंगारगल्ली ते सिटी चौक आणि मुकुंदवाडी ते संजयनगर रस्त्यांवरील अतिक्रमण काढून सर्व्हिस रोडची जागा मोकळी केली आहे. लवकरच पडेगाव आणि पैठण रस्त्यावरही मोहीम राबविली जाणार आहे.

प्रमुख रस्त्यांसोबतच महापालिकेने आता विकास आर-ाखड्यातील अंतर्गत रस्तेही मोकळे करण्याचा निर्णय घेतला आहे. यात शहराच्या मुख्य बाजारपेठेतील काही पीआरकार्ड एक मालमत्ताधारक दोन जुना मोंढा भागात अनेक व्यापाऱ्यांच्या पीआर कार्डचा वाद आहे. यात दोन मालमत्ताधारकांचा एकाच पीआर कार्डावर उल्लेख आहे. हा प्रकार बहुतांश मालमत्तांबाबत आहे. त्यामुळे मोबदल्यावेळी अनेकांच्या अडचणी होणार असल्याचीही चर्चा आहे.

Chhatrapati Sambhajinagar
Amol Khotkar Viral Video: 'किंग ऑफ मर्डर, एक कोटीची सुपारी द्या कोणालाही उडवितो', जुना व्हिडिओ व्हायरल

रस्ता १५ मीटर रुंद होणार

मुख्य बाजारपेठेतील रंगारगल्ली, सराफाबाजार, गुलमंडी (बाराभाई ताजीया) ते अंगुरीबाग पुढे नवाबपुरा ते राजाबाजार येथील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महापालिका प्रशासनाने रुंदीकरणावर भर दिला आहे. यात गुलमंडी ते नवाबपुरा या १५ मीटर रस्त्याच्या रुंदीकरणाची कारवाई हळूहळू सुरू झाली असून, येथील बाधित ६० मालमत्ताधारकांना प्रशासनाने नोटीस बजावल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news