Marathwada University Protest : विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे आंदोलन

सलग दुसऱ्या दिवशी काळ्या फिती लावून काम
Marathwada University Protest
मुख्य इमारतीसमोर काळ्या फिती लावून कर्मचारी सहभागी झाले. यावेळी अध्यक्ष डॉ. कैलास पाथ्रीकर यांनी मार्गदर्शन केले.pudhari photo
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठासह राज्यातील अकृषी विद्यापीठे व संलग्न महाविद्यालयांतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य विद्यापीठीय व महाविद्यालयीन सेवक संयुक्त कृती समितीने आंदोलनाला सुरुवात केली असून, सलग दुसऱ्या दिवशी काळ्या फिती लावून काम केले. दुसऱ्या टप्प्यात राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा राज्य कार्याध्यक्ष डॉ. कैलास पाथ्रीकर यांनी दिला.

आश्वासित प्रगती योजना तत्काळ लागू करा, २००५ नंतर नियुक्त कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करा, शिक्षक पदभरतीप्रमाणेच अकृषी विद्यापीठे व संलग्न महाविद्यालयांतील रिक्त शिक्षकेतर पदे भरण्यास मंजुरी द्यावी. या व इतर मागण्यांसाठी १४ पासून टप्प्याटप्प्याने आंदोलन करण्यात येत आहे. १४ ते १६ मे दरम्यान काळ्या फिती लावून कामकाज केले. पुढील टप्प्यात १८ ते २० मे दरम्यान धरणे व निषेध सभा घेण्यात येणार आहेत.

Marathwada University Protest
Physical Education Teachers Protest: शारीरिक शिक्षकही जाणार संपावर; येत्या 27 एप्रिलपासून आझाद मैदान मुंबईत शिक्षकांचे उपोषण

आंदोलन तीव्र करणार विद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी गुरुवार व शुक्रवारी काळ्या फिती लावून काम केले. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी (दि.१५) दुपारी द्वारसभा घेण्यात आली. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन चालू ठेवण्याचा निर्धार करण्यात आला. यावेळी डॉ. कैलास पाथ्रीकर, अनिल खामगावकर, मनोज शेटे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Marathwada University Protest
Mumbai municipal schools PAT exam : सफाई कामगारांच्या हाती ‌‘पॅट‌’ परीक्षेचे पर्यवेक्षण!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news