Sambhajinagar News : बदाम फुफ्फुसात अडकलेल्या चिमुकल्यास नवजीवन

घाटीतील तज्ज्ञ डॉक्टरांकडून यशस्वी 'ब्रोन्कोस्कोपी'
Sambhajinagar News
Sambhajinagar News : बदाम फुफ्फुसात अडकलेल्या चिमुकल्यास नवजीवनfile photo
Published on: 
Updated on: 

New lease of life for a toddler with an almond stuck in their lungs

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा अवघ्या एक वर्षाच्या चिमुकल्याने अनावधानाने तोंडात बदाम टाकला. या बदामाच तुकडा गिळला जाऊन थेट फुफ्फुसात अडकल्याने अवस्थ अवस्थेत नातेवाईकांनी त्याला घाटीत दाखल केले. इथे ईएनटी विभागातील तज्ज्ञ डॉक्टरांनी तातडीने 'ब्रोन्कोस्कोपी' व्दारे फुफ्फुसात अडकलेला बदामाचा तुकडा काढत त्या चिमुकल्यास नवसंजीवनी दिली.

Sambhajinagar News
Sambhajinagar News : वर्षभर टँकरचा प्रस्ताव, नव्या पाणी योजनेचा जल्लोष कशासाठी?

दिवाळीच्या आधी या चिमुकल्यास घाटीत उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. बदाम अडकल्याने हा चिमुकला अस्वस्थ्य आणि कृत्रिम श्वासोच्छ्वावर होता. अशा परिस्थितीत तातडीने निर्णय घेत घाटीचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांच्या मार्गदर्शनाखाली कान-नाक-घसा विभागप्रमुख डॉ. सुनील देशमुख यांनी त्यांच्या टीमच्या सहकार्याने या चिमुकल्यावर ब्रोन्कोस्कोपीची यशस्वी शस्त्रक्रिया केली.

Sambhajinagar News
Loan waiver : कर्जमाफी रखडली, बँकांकडून वसुलीचा तगादा

यासाठी घाटीतील बालरोग पथकप्रमुख डॉ. तृप्ती जोशी, बधिरीकरणशास्त्र विभागाचे डॉ. गणेश निकम, ईएनटी विभागातील डॉ. गणेश मोहन आणि निवासी डॉक्टर, तसेच ओटी१ स्टाफ, कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.