Navratri Festival : कर्णपुऱ्यात आई तुळजाभवानीचा जयघोष

घटस्थापना करून उत्सवास सुरुवात; शेतकऱ्यांचे संकट दूर करण्यासाठी देवीला साकडे
Navratri Festival
Navratri Festival : कर्णपुऱ्यात आई तुळजाभवानीचा जयघोषfile photo
Published on: 
Updated on: 

Navratri Festival Goddess Tuljabhavani Karnapura

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहराचे ग्रामदैवत आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कर्णपुरा येथील श्री तुळजाभवानी माता मंदिरात नवरात्र उत्सवाला आजपासून भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला, मंदिर संस्थापक अध्यक्ष तथा आ. अंबादास दानवे यांच्या हस्ते सकाळी सात वाजता विधिवत घटस्थापना करण्यात आली. यावेळी आई तुळजाभवानीचा जयघोष अशा मंगलमय वातावरणात महाआरती करण्यात आली. भाविकांनी देवीचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केली.

Navratri Festival
New Water Supply Scheme : नव्या जलकुंभांच्या जोडणीसाठी आज पुन्हा २४ तासांचा शटडाऊन

कर्णपुरा येथील श्री तुळजाभवानी माता मंदिराला सुमारे ३५० वर्षांची ऐतिहासिक परंपरा लाभली आहे. शहरासह मराठवाडा आणि राज्याच्या विविध भागांतील भाविकांचे हे प्रमुख श्रद्धास्थान मानले जाते. नऊ दिवस चालणाऱ्या या नवरात्र उत्सवात देवीच्या दर्शनासाठी हजारो भाविक कर्णपुरात येणार आहे. आज पहिल्या माळेला मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी आले.

नवरात्राच्या पहिल्या दिवशी घटस्थापनेद्वारे उत्सवाला सुरुवात झाली. धार्मिक विधी आणि महाआरतीमुळे मंदिर परिसरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने रविवारची सुट्टी आणि पहिली माळ असल्याने भविकांनी पहाटेपासूनच दर्शनासाठी रांगा लावल्या. यावेळी मान्यवरांच्या हस्ते आरती करून भाविकांनी दर्शन घेतले. यावेळी आ. अंबादास दानवे, माजी महापौर नंदकुमार घोडेले, राजू दानवे, संतोष दानवे, बाळासाहेब दानवे, पोपट दानवे, नंदू राजपूत, संतोष मरमठ, किशोर कच्छवा यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Navratri Festival
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटेचा जामीन अर्ज फेटाळला

शेतकऱ्यांच्या सुख-समृद्धीसाठी देवीच्या चरणी प्रार्थना

राज्यातील शेतकऱ्यांवर आलेले संकट दूर व्हावे, शेतकरी बांधवांना दिलासा मिळावा आणि त्यांच्या जीवनात सुखाचे दिवस यावेत, अशी प्रार्थना आ. अंबादास दानवे यांनी आई तुळजाभवानीच्या चरणी केली. शेतकरी हा समाजाचा महत्त्वाचा आधार असून त्यांच्यावरील संकट दूर होऊन त्यांच्या कष्टाला योग्य फळ मिळावे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. राज्यातील शेतकरी विविध संकटांना सामोरे जात असताना त्यांच्या जीवनात स्थैर्य आणि समृद्धी यावी, पिकांना चांगले उत्पन्न मिळावे आणि शेतकरी कुटुंबांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण व्हावे, यासाठी देवीला साकडे घालण्यात आले. यासोबतच सर्व नागरिकांच्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी नांदावी, अशी प्रार्थनाही करण्यात आली.

शहरातील मंदिरे आणि घरोघरी घटस्थापना

शहरातील विविध माता मंदिरात सकाळी घटस्थापना करून नवरात्र उत्सवाला प्रारंभ झाला. तसेच घरोघरी आज घटस्थापना करण्यात आली. सकाळपासून मोठा उत्साह होता. आज पहिली माळ असल्याने घरोघरी देवीचा पाठ, आराधना करून नवरात्र उत्सवाला प्रारंभ झाला. यंदा पाऊस कमी असल्याने दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. हे संकट दूर व्हावे यासाठी सर्वांनी प्रार्थना केली. तसेच जनकल्याणासाठी सर्वांनी प्रार्थना केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news