New Water Supply Scheme : नव्या जलकुंभांच्या जोडणीसाठी आज पुन्हा २४ तासांचा शटडाऊन

एक्स्प्रेस जलवाहिनीवर दुरूस्तीची कामे : शिवाजीनगर, मरिमाता, गारखेड्यासह अनेक भागांतील पाणीपुरवठ्यावर परिणाम
New Water Supply Scheme
New Water Supply Scheme : नव्या जलकुंभांच्या जोडणीसाठी आज पुन्हा २४ तासांचा शटडाऊनfile photo
Published on: 
Updated on: 

Another 24-hour shutdown today for connecting new water storage tanks

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा नवीन पाणीपुरवठा योजनेतील : जलकुंभांपर्यंत पाणी पोहोचविण्यासाठी मुख्य जलवाहिनीवर जोडण्या देण्यासह गळती दुरुस्तीची कामे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून हाती घेण्यात येणार आहेत. यासाठी आज सोमवारी (दि. १२) सकाळी ८ ते मंगळवारी (दि. १३) सकाळी ८ वाजेपर्यंत १११८ मिमी व्यासाच्या एक्स्प्रेस जलवाहिनीवरील पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. या शटडाऊनचा शिवाजीनगर, सिडको एन-५, मरिमाता, गारखेडा, सूतगिरणी चौक आदी भागांतील पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे.

New Water Supply Scheme
Marathwada Graduate Election 2026 : पाटील ४८ कोटींचे, तर चव्हाण ३८ कोटींचे मालक

मात्र कामे पूर्ण झाल्यानंतरही काही भागांत पुढील एक ते दोन दिवस पाणीपुरवठा विस्कळीत राहण्याची, व निर्धारित वेळेपेक्षा उशिराने पाणी मिळण्याची शक्यता असल्याची माहिती रविवारी (दि. ११) महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता दत्तात्रय गायकवाड यांनी दिली.

शहरातील पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक अद्याप रुळावर आलेले नसून महापालिकेने पुन्हा २४ तासांच्या शटडाऊनचे नियोजन केले आहे. नवीन पाणीपुरवठा योजनेतील जलकुंभांना मुख्य जलवाहिनीशी जोडणे आणि जलवाहिनीवरील गळती दुरुस्त करण्यासाठी सोमवारी सकाळी ८ ते मंगळवारी सकाळी ८ वाजेपर्यंत शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

याकाळात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत नवीन पाणीपुरवठा योजनेअंतर्गत आमेरनगर, सुधाकरनगर, ए.जी.पी. हायस्कूल आणि एसएफएस गारखेडा येथे जलकुंभउभारण्यात आले आहेत. या जलकुंभांमध्ये पाणी भरण्यासाठी टाकण्यात आलेल्या जलवाहिन्या १११८ मिमी व्यासाच्या एक्स्प्रेस लाइनला जोडण्यात येणार आहेत. त्यामुळे एक्स्प्रेस लाइनवरून शहरातील अनेक भागांना पाणीपुरवठा होत असल्याने या कामांचा परिणाम संबंधित भागांतील पाणी वितरणावर होणार आहे. तसेच शटडाऊन संपल्यानंतर जोडणीची कामे पूर्ण करून टप्प्याटप्प्याने पाणीपुरवठा सुरू केला जाणार आहे.

New Water Supply Scheme
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटेचा जामीन अर्ज फेटाळला

तसेच संपूर्ण यंत्रणा पूर्ववत होण्यासाठी आणखी एक ते दोन दिवस लागू शकतात. त्यामुळे काही भागांत पाणी उशिराने मिळण्याची शक्यता आहे. नागरिकांनी पुरेसा पाणीसाठा करून ठेवावा आणि पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन मनपाकडून करण्यात आले आहे. तर जोडणीची कामे पूर्ण झाल्यानंतरच टप्प्याटप्प्याने पुरवठा सुरळीत होईल, असे पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता दत्तात्रय गायकवाड यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, यापूर्वी ९ ऑक्टोबरला जुन्या शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीवरील गळती दुरुस्ती आणि नवीन योजनेतील ७०० मिमी जलवाहिनीचे क्रॉस कनेक्शन करण्यासाठी २४ तासांचा शटडाऊन घेण्यात आला होता. तो दुसऱ्या दिवशी सकाळी तो संपणे अपेक्षित होते. मात्र, प्रत्यक्ष कामासाठी सुमारे ३० तासांचा अवधी लागला होता.

सहा जलकुंभांच्या जोडणीची कामे

१११८ मिमी व्यासाच्या एक्स्प्रेस जलवाहिनीतून आमेरनगर, सुधाकरनगर, एसएफएस गारखेडा आणि ए.जी.पी. हायस्कूल परिसरातील जलकुंभांना पाणी पोहोचविणाऱ्या जलवाहिन्या मुख्य जलवाहिनीशी जोडण्यात येणार आहेत. याशिवाय ज्योतीनगर आणि विश्वभारती परिसरांतील जलकुंभभरण्यासाठी मुख्य जलवाहिनीला छेद जोडणी दिली जाणार आहे. या कामांसोबत मुख्य जलवाहिनीवरील गळतीच्या दुरुस्तीची कामे पूर्ण करण्यासाठी शटडाऊन घेण्याचे नियोजन असल्याची माहिती कार्यकारी अभियंता दत्तात्रय गायकवाड यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news