नाथसागर धरणावर रात्री ६ ड्रोन कॅमेऱ्यांव्दारे टेहळणी; सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

नाथसागर धरणाच्या प्रतिबंधित क्षेत्रात ड्रोन कॅमेऱ्यांची टेहळणी
Nathsagar Dam was monitored by 6 drone cameras at night
नाथसागर धरणाची सुरक्षा ऐरणीवर, रात्री ६ ड्रोन कॅमेऱ्यांनी केली टेहळणी File Photo
Published on
Updated on

पैठण : पुढारी वृत्तसेवा

मराठवाड्याच्या औद्योगिक नगरीसह शेती, सिंचनासाठी वरदान ठरलेल्या पैठण येथील नाथसागर धरणाच्या प्रतिबंधक क्षेत्रातील भागामध्ये मंगळवार दि.२५ रोजी रात्रीच्या दरम्यान अचानक सहा ड्रोन कॅमेऱ्याद्वारे धरण परिसराची टेहाळणी करण्यात येत असल्याचा प्रकार येथील सुरक्षारक्षकाच्या निदर्शनास आला. यामुळे धरणावर रात्री एकच खळबळ उडाली होती. सदरील प्रकाराची माहिती तात्काळ धरण उप अभियंता विजय काकडे यांनी पैठण पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांना कळवली. यावर तात्काळ धरण परिसरात पोलिसांनी धाव घेतली. परंतु त्यावेळेस हे कॅमेरे धरण परिसरातून बाहेर निघून गेल्यामुळे या धरणाच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या संदर्भात पैठण पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

Nathsagar Dam was monitored by 6 drone cameras at night
Stock Market Updates |सेन्सेक्सचा नवा विक्रमी उच्चांक! निफ्टी २३,७०० पार

धरणाच्या परिसरात अज्ञात वस्तूकडून घिरट्या

या विषयी अधिक माहिती अशी की, काल (मंगळवार) रात्री धरण नियंत्रण कक्षात पाण्याची नोंद घेण्यासाठी कर्तव्यावर असलेले पाटबंधारे विभागाचे कर्मचारी व सुरक्षारक्षक यांना अचानक धरणाच्या पाण्याच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर काहीतरी अज्ञात वस्तू घिरट्या मारीत असल्याचे निदर्शनास आले. या संदर्भात तात्काळ सदरची माहिती धरण उपअभियंता विजय काकडे यांनी वरिष्ठ कार्यकारी अभियंता यांना दिली. तसेच पैठण पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांच्याशी संपर्क केला. पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांनी पोलीस उपनिरीक्षक एकनाथ नागरगोजे, पोना राजेश आटोळे, नरेंद्र अंधारे, कृष्णा दुबाले या पथकासह धरणावर जाऊन पाहणी केली. परंतु सदरील कॅमेरे धरण परिसराच्या बाहेर गेले होते.

Nathsagar Dam was monitored by 6 drone cameras at night
Lok Sabha Speaker Election 2024 : ओम बिर्ला यांची लोकसभेच्या अध्यक्षपदी निवड

धरणाची सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न

या संदर्भात आज (बुधवार) पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव व धरण उपअभियंता विजय काकडे हे पैठण पोलिसात अज्ञात कॅमेऱ्याने धरण प्रतिबंधक क्षेत्रात विनापरवाना टेहळणी केल्याप्रकरणी तक्रार दाखल करणार असून, या सर्व प्रकारामुळे धरणाची सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

Nathsagar Dam was monitored by 6 drone cameras at night
छत्रपती संभाजीनगर : भांबरवाडीत बिबट्याच्या हल्‍ल्‍यात तरूण ठार, गावात दहशत

पाटबंधारे विभाग धरणावर लावणार कॅमेरे

दरम्यान एवढ्या मोठ्या नाथासागर धरणावर पाटबंधारे विभागाने सुरक्षा दृष्टिकोनातून सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आलेले नाहीत. सध्या या परिसरात पैठण नगर परिषद विभागाचे सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. परंतु तेही बंद अवस्थेत असल्याने धरणावर कोण येते-जाते. याबाबत माहिती प्राप्त होत नाही. पाटबंधारे विभागाकडून लवकरच सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येतील असे सांगण्यात आले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news