

पैठण :- पैठण येथील नाथसागर धरण ९० टक्के भरल्याने गुरुवारी दि.३१ रोजी धरणातील पाण्याचे जलपूजन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे, आमदार विलास बापू भुमरे यांच्या हस्ते करण्यात येऊन दुपारी तीन वाजता धरणाची १८ दरवाजे ०.५ फुटाने उघडण्यात येणार असून गोदावरी नदीत प्रथम ९ हजार ४३२ क्युसेक पाण्याचा कार्यकारी अभियंता यांच्या आदेशावरून विसर्ग सुरू करण्यात येणार असल्याची माहिती धरण शाखा अभियंता मंगेश शेलार यांनी दिली आहे.
गेल्या पाच दिवसापासून नाथसागर धरणाचे दरवाजे केव्हा उघडणार अशी चर्चा होत असल्याने अखेर पाटबंधारे विभागाने मुहूर्त काढून गुरुवारी रोजी दुपारी तीन वाजता राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे, आमदार विलास बापू भुमरे यांच्या हस्ते धरणातील पाण्याची जलपूजन करण्यात येणार असून.
यावेळी जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता प्रशांत संत, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, उपविभागीय अधिकारी नीलम बाफना, तहसीलदार ज्योती पवार, नगरपरिषद मुख्याधिकारी डॉ. पल्लवी अंभोरे, पंचायत समिती गटविकास अधिकारी मनोरमा गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती नाथसागर धरणाचे १८ दरवाजे ०.५ खुले करून गोदावरी नदीत ९ हजार ४३२ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात येणार असून. यामुळे. गोदावरी नदीच्या परिसरातील गावातील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा पाटबंधारे विभागाने दिला आहे. बुधवारी रात्री नऊ वाजेच्या दरम्यान येथील नाथसागर धरणामध्ये १६ हजार २३० क्युसेक पाण्याची आवक सुरू असल्याची नोंद नियंत्रण कक्षात करण्यात आली असून. धरणामध्ये ९०.१३ टक्के पाणी उपलब्ध आहे.