Hamal Mathadi Union strike : हमाल माथाडी संघटनेचा संप 15 दिवसांनंतर मिटला

5 मार्चपासून सुरू होणार कापूस लिलाव
Hamal Mathadi Union strike
हमाल माथाडी संघटनेचा संप 15 दिवसांनंतर मिटलाpudhari photo
Published on
Updated on

मानवत : हमालांच्या मजुरीत दरवाढ करावी, या मुख्य मागणीसाठी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत कार्यरत हमाल माथाडी मजूर युनियन (लाल बावटा) यांनी 16 फेबुवारीपासून सुरू केलेले बेमुदत कामबंद आंदोलन रविवारी (दि.1) तोडगा निघाल्याने अखेर मागे घेण्यात आले. शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

हमाल माथाडी संपामुळे येथील बाजार समिती अंतर्गत गेल्या 15 दिवसांपासून कापूस, भुसार व अन्य खरेदी विक्रीचे व्यवहार बंद झाल्याने शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांना याचा मोठा आर्थिक फटका बसला होता. हमालीच्या दरात वाढीसाठी संघटनेचे सदस्य ठाम होते.

Hamal Mathadi Union strike
Gold-Silver Price : युद्धाने सोने-चांदीचे दर गगनाला भिडले

बाजार समितीचे सभापती पंकज आंबेगावकर, सचिव शिवनारायण सारडा, संचालक व व्यापारी संघटनेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर मोरे, जिनिंग संघटनेचे अध्यक्ष गिरीश कत्रूवार, अडत संघटनेचे अध्यक्ष आश्रोबा कुऱ्हाडे, हमाल माथाडी संघटनेचे अध्यक्ष रंगनाथ वावरे, शेतकरी प्रतिनिधी रामभाऊ शिंदे व गोविंद घांडगे यांच्यात झालेल्या बैठकीनंतर शेवटी तोडगा निघाल्याने संप मागे घेण्यात आला.

5 मार्चपासून होणार कापूस लिलाव

हमाल संघटनेच्या संपामुळे गेल्या पंधरा दिवसांपासून येथील बाजार समितीच्या यार्डात बंद असलेले कापूस व अन्य भुसार मालाचे खरेदी विक्री व्यवहार ठप्प झालेले व्यवहार 5 मार्चपासून पूर्ववत सूरू होणार आहेत. शेतकऱ्यांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन बाजार समिती सभापती पंकज आंबेगावकर यांनी केले आहे.

Hamal Mathadi Union strike
मराठवाड्यातील १११ जण आखाती देशांमध्ये अडकले

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news