Bribe Case : पाचशे रुपयांची लाच घेताना मनपा कर्मचारी रंगेहाथ पकडला

लाचलुचपत विभागाची कारवाई, अंत्यविधीची पावती व अन्य कागदपत्रांसाठी केली होती एक हजार रुपयांची मागणी
Bribe Case
Bribe Case : पाचशे रुपयांची लाच घेताना मनपा कर्मचारी रंगेहाथ पकडलाFile Photo
Published on
Updated on

Municipal employee caught red-handed while taking a bribe of five hundred rupees

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा मृताच्या अंत्यविधीसाठी लागणारी पावती व अन्य कागदपत्रांसाठी मनपा कंत्राटी कर्मचाऱ्याने हजार रुपये लाचेची मागणी केली. त्यापैकी पाचशे रुपयांची लाच घेताना शुक्रवारी (दि.१४) झोन क्रमांक ६ येथील जन्म-मृत्यू प्रमाणपत्र विभागातील कंत्राटी संगणक ऑपरेटरला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.

Bribe Case
Shivshahi bus breakdown : एसटीचा स्पेशल ड्राईव्ह कागदावरच

फिरोज जाफर खान (४५, रा. रोझाबाग) व झेरॉक्स दुकान चालक शेख कडू इब्राहिम (५३, रा. ब्राह्मण गल्ली, चिकलठाणा) अशी कारवाई करण्यात आलेल्या लाचखोरांची नावे असून, त्यांच्यावर सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती अधीक्षक माधुरी कांगणे यांनी दिली. यासंदर्भात तक्रारदार यांचे चुलत भावाचे अनिल अशोक भालेराव यांचे अपघाती निधन झाले होते. त्यांच्या पत्नीने अंत्यविधीची पावती व इतर आवश्यक कागदपत्रांसाठी ११ नोव्हेंबरला मनपाच्या झोन ६ मध्ये लेखी अर्ज दिला होता.

तेथील संगणक ऑपरेटर फिरोज खान याने कागदपत्रे देण्यासाठी एक हजार रुपयांची लाच मागितली. लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार केली. तक्रारीच्या अनुषंगाने पडताळणी केली असता, फिरोज खान याने एक हजार रुपयांची लाच मागून तडजोडी अंती ५०० रुपयांची लाच स्वीकारण्याचे मान्य केले.

Bribe Case
Temperature Drop : किमान तापमान २ ते ३ अंशांनी घटणार, हवामान खात्याचा अंदाज

शुक्रवारी जन्म-मृत्यू प्रमाणपत्र विभागात तक्रारदाराला फिरोज याने लाचेची ५०० रुपयांची रक्कम झेरॉक्स दुकान चालक शेख इब्राहिम याच्या हाती देण्यास सांगितले. त्याने ती रक्कम स्वीकारताच पथकाने दोघांना ताब्यात घेतले. त्याच्याकडील मोबाईल तसेच लाचेची ५०० रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली. ही कारवाई निरीक्षक संतोष तिगोटे, हवालदार राजेंद्र जोशी, अनवेज शेख, प्रकाश डॉगरदिवे, सी. एन. बागुल यांच्या पथकाने केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news