

छत्रपती संभाजीनगर : महापालिका निवडणुकीचे राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, खोकडपुरा प्रभाग क्रमांक 16 मधील राष्ट्रवादी काँग््रेास (अजित पवार गट) च्या उमेदवाराच्या प्रचार कार्यालय जाळण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना मंगळवारी (दि.6) मध्यरात्रीनंतर कैलासनगर भागात घडली. हे कार्यालय जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली असून, निवडणूक प्रचाराला हिंसक वळण लागत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खोकडपुरा प्रभाग 16 च्या राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवारासह कार्यकर्ते मंगळवारी (दि.6) प्रचारानंतर घरी गेले होते. दरम्यान मध्यरात्री अज्ञात व्यक्तींनी प्रचार कार्यालयाच्या बाहेरील कापडी कमानीला आग लावली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकारानंतर राष्ट्रवादी काँग््रेास अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी तीव संताप व्यक्त केला.
कार्यालय जाळण्याचा सर्व प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला असून, याप्रकरणी जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी बाळू ऊर्फ योगेश मुळे (40, रा. कैलासनगर) याला अटक केल्याची माहिती जिन्सी पोलिस ठाण्याचे निरीक्षक शिवाजी बुधवंत यांनी दिली. आरोपी गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून, त्याचा कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंध नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.
या गाडीत जलील हे कार्यकर्त्यांसोबत बसलेले होते. हा प्रकार घडल्यानंतर पोलिसांनी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी सौम्य लाठीचार्ज केला. यानंतर कार्यकर्ते सैरभैर पळाले, तर काही कार्यकर्त्यांनी एकमेकांवर हल्ले सुरूच ठेवले. यात काही कार्यकर्त्यांच्या हातात फायटर आणि रॉड असलल्याचाही उल्लेख दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आला. याप्रकरणी जलील यांच्या कार्यकर्त्यांनी जिन्सी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.