

Municipal Corporation's 'Shasti se Azadi' scheme
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहरात निवासीसह सर्व प्रकारच्या ३ लाख ५ हजार मालमत्ता आहेत. त्यांच्याकडे मालमत्ता कराप-ोटी आतापर्यंत व्याजासह १२३० कोटी रुपये थकले आहेत. यात केवळ शास्ती म्हणजे व्याजाचेच २२९ कोटी रुपये असून, महापालिकेच्या शास्ती से आझादी या योजनेमुळे शहरवासीयांना २२९ कोटी रुपयांचा लाभ मिळणार असल्याची माहिती प्रशासक जी. श्रीकांत यांनी शुक्रवारी (दि.१) पत्रकार परिषदेत दिली.
महापालिका प्रशासनाने शहरवासीयांसाठी शास्ती से आझादी आणि शास्ती से मुक्ती ही मालमत्ता कराबाबत विशेष योजना सुरू केली आहे. या योजनेत थकीत मालमत्ता कराच्या शास्ती म्हणजेच व्याजावर १५ जुलै ते १५ ऑगस्टपर्यंत ९५ टक्के आणि १६ ऑगस्ट ते १६ सप्टेंबरपर्यंत ७५ टक्के सवलत दिली जाणार आहे.या सवलतीबाबत सविस्तर माहिती देताना प्रशासक जी. श्रीकांत म्हणाले की, या सवलत योजनेला शहरवासीयांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. गेल्या वर्षी ही योजना नसल्याने कर वसुलीतून दरर-ोज ७० ते ८० लाख रुपयेच महापालिकेला मिळत होते. परंतु शास्तीसे आझादी योजनेमुळे दिवसभरात दोन कोटी ८१ लाखांचा कर महापालिकेच्या तिजोरीत जमा होत आहे.
योजनेत ३०० कोटी वसुलीची अपेक्षा महापालिकेने शास्ती से आझादी आणि शास्ती से मुक्ती, अशी योजना मालमत्ता कर थकविणाऱ्यांसाठी सुरू केली आहे. १६ सप्टेंबरपर्यंत योजनेचा लाभ मालमत्ताधारकांना घेता येणार आहे. या योजनेमुळे मनपा तिजोरीत दररोज २.८० कोटी जमा होत आहे. दोन महिन्यांत योजनेमुळे किमान ३०० कोटी वसूल होतील, अशी अपेक्षा असल्याचे प्रशासक जी. श्रीकांत यांनी व्यक्त केली.
कोणाकडे किती थकले...
मालमत्ताचे प्रकार-संख्या-थकबाकी-व्याज निवासी मालमत्ता-२९१०००-६०० कोटी-१५६ कोटी शैक्षणिक मालमत्ता-१४७-८.८७ कोटी-१.४५ व्यावसायिक मालमत्ता-१३५६९-१३८ कोटी-२७.६० कोटी औद्योगिक मालमत्ता-५६६-७.५४ कोटी-१.२० कोटी