Sambhajinagar News : अंत्यसंस्कार लांबल्यास महापालिका देणार शवपेटी

यासंदर्भातील प्रस्ताव नगरसेवक रेणुकादास (राजू) वैद्य यांनी शुक्रवारी (दि. १३) सर्वसाधारण सभेत मांडला.
अंत्यसंस्कार लांबल्यास महापालिका देणार शवपेटी
अंत्यसंस्कार लांबल्यास महापालिका देणार शवपेटीfile photo
Published on: 
Updated on: 

Municipal corporation to provide a coffin if the funeral is delayed

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : कुटुंबातील प्रमुख व्यक्ती नोकरी किंवा व्यवसायानिमित्त शहराबाहेर, अन्य राज्यात अथवा परदेशात वास्तव्यास असताना घरी एखाद्या व्यक्तीचे निधन झाल्यास अंत्यसंस्कारासाठी विलंब होतो. अशा वेळी मृतदेह सुरक्षित ठेवण्याची गैरसोय टाळण्यासाठी महापालिका रुग्णालयांमध्ये शवपेट्या उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. यासंदर्भातील प्रस्ताव नगरसेवक रेणुकादास (राजू) वैद्य यांनी शुक्रवारी (दि. १३) सर्वसाधारण सभेत मांडला.

अंत्यसंस्कार लांबल्यास महापालिका देणार शवपेटी
Sambhajinagar News : दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी ठाकरे सेनेच्या नगरसेवकांचा पुढाकार !

सभागृहाने या प्रस्तावाला मंजुरी दिली. शहरातील अनेक कुटुंबांमधील तरुण नोकरी, व्यवसायानिमित्त अन्य शहरांत किंवा परदेशात स्थायिक झाले आहेत. मात्र त्यांचे वृद्ध आई-वडील आणि कुटुंबीय छत्रपती संभाजीनगरमध्येच राहतात. अशा परिस्थितीत घरातील एखाद्या व्यक्तीचे निधन झाल्यास बाहेरगावी असलेल्या कुटुंबीयांना शहरात पोहोचण्यासाठी एक-दोन दिवस लागू शकतात. त्यांच्या आगमनापर्यंत मृतदेह जतन करून ठेवण्याची वेळ नातेवाइकांवर येते.

त्यासाठी शवागाराचा आधार घ्यावा लागतो. सरकारी तसेच खासगी रुग्णालयांमध्ये शवागारांची सुविधा उसकी संभावित मालमत्स्यासिका छत्रपती संभाजीनगर असली, तरी मृतदेह घरातून रुग्णालयात नेणे आणि अंत्यसंस्काराच्या वेळी पुन्हा घरी आणणे कुटुंबीयांसाठी त्रासदायक ठरते. प्रत्येक कुटुंबाला ही व्यवस्था करणे शक्य होत नाही.

अंत्यसंस्कार लांबल्यास महापालिका देणार शवपेटी
Child Marriage : बालविवाह रोखण्यासाठी आता शाळांमध्येच दिले जाणार धडे

त्यामुळे महापालिकेच्या सक्षम रुग्णालयांमध्ये शवपेट्या उपलब्ध करून दिल्यास नागरिकांची मोठी गैरसोय दूर होईल, अशी भूमिका वैद्य यांनी मांडली. या प्रस्तावावर चर्चा करताना सदस्य मनोज गांगवे यांनी शवपेट्या खरेदीसाठी नगरसेवकांनी स्वेच्छानिधीतून निधी उपलब्ध करून द्यावा, अशी सूचना केली. तसेच या उपक्रमाच्या व्यवस्थापनासाठी स्वयंसेवी संस्थांना सहभागी करून घेण्याची सूचनाही करण्यात आली.

त्यामुळे शवपेट्यांची देखभाल व्यवस्थित होऊन नागरिकांना चांगली सेवा देता येईल, असेही यावेळी सांगण्यात आले. यावर महापौर समीर राजूरकर यांनी सदस्यांनी केलेल्या सूचनांचा विचार करून प्रशासनाने प्रस्तावात आवश्यक ते बदल करावेत, असे निर्देश दिले. त्यानंतर सभागृहात प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.