

Municipal Corporation to carry out bulldozer action against encroachments in the old city tomorrow
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा जुन्या शहरातील वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरणाऱ्या अतिक्रमणांवर आता महापालिका प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारण्याची तयारी केली असून शहरातील मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमणे हटविल्यानंतर अतिक्रमण हटाव मोहिमेची वक्रीनजर जुन्या शहराकडे वळली आहे. रोशन गेट ते चंपा चौक आणि चंपा चौक ते कटकट गेट या वर्दळीच्या मार्गावरील अतिक्रमणे शनिवारी (दि. १७) हटविण्यात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर गुरुवारी (दि.१५) महापालिकेच्या पथकाने चंपा चौक परिसरासह संपूर्ण मार्गाची पाहणी करून संबंधितांना अतिक्रमणे स्वतःहून काढून घेण्याचे आवाहन केले.
वारंवार वाहतुकीला अडथळे निर्माण होत असलेल्या जुन्या शहरातील प्रमुख रस्त्यांवर अनेक दुकानदारांनी दुकानांचे, तर काही नागरिकांनी घरांचे बांधकाम रस्त्याच्या हद्दीपर्यंत आणले आहे. त्यामुळे रस्त्यांची रुंदी कमी झाली आहे. पादचाऱ्यांसाठी असलेले फुटपाथही अतिक्रमणांच्या मी विळख्यात सापडल्याने नागरिकांना रस्त्यावरून चालावे वा लागत आहे. या परिस्थितीमुळे संबंधित मार्गांवर दररोज वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असून, अतिक्रमणांवर ठोस कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.
यावरून महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे सनियंत्रण अधिकारी संतोष वाहुळे आणि त्यांच्या पथकाने कारवाईच्या पूर्वतयारीसाठी गुरुवारी रोशन गेट ते चंपा चौक तसेच चंपा चौक ते कटकट गेट या मार्गाची पाहणी केली. रस्त्याच्या हद्दीत येणारा अतिक्रमित भाग संबंधितांनी स्वतःहून काढून घ्यावा, र अशी विनंती यावेळी करण्यात आली. याबाबत परिसरात न ध्वनिक्षेपकाद्वारे अनाऊन्समेंटही करण्यात आली आहे.
तसेच डे अतिक्रमण हटविण्यापूर्वी संबंधितांना नोटीस द्यावी, अशी मागणी काही स्थानिक नागरिकांनी केली. मात्र, रस्त्यात आणि सार्वजनिक जागेत असलेल्या अतिक्रमणांसाठी स्वतंत्र नोटीस देण्याची आवश्यकता नसल्याची भूमिका महापालिका प्रशासनाने स्पष्ट केली आहे. त्यामुळे शनिवारी या मार्गांवर प्रत्यक्ष कारवाई सुरू होण्याची शक्यता आहे. या मार्गावरील अतिक्रमण हटविण्यासाठी जेसीबीसह पथक तैनात केले जाणार असून, रस्त्यावरील अडथळे दूर करण्यावर भर दिला जाणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.