Fraud Case : १२ वी नापास सराईत गुन्हेगाराचा 'तोतया पोलिस' बनून रुबाब

हवालदार असल्याचे सांगून १० दिवस लॉजवर मुक्काम; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
Fraud Case
Fraud Case : १२ वी नापास सराईत गुन्हेगाराचा 'तोतया पोलिस' बनून रुबाबfile photo
Published on: 
Updated on: 

Man stayed at a lodge for 10 days by claiming to be a police constable; arrested by police

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : ठाणे पोलिस दलात भरती झालो असून सोलापूरला ट्रेनिंग पूर्ण केली आहे, अशी बतावणी करत खेळाच्या स्पर्धेच्या नावाखाली शहरातील लॉजवर गेल्या दहा दिवसांपासून मुक्काम ठोकणाऱ्या एका ३१ वर्षीय तोतया पोलिसाचा सिटीचौक पोलिसांनी पर्दाफाश केला. खाकीचा रुबाब दाखवणारा हा तोतया चक्क १२ वी नापास असून, सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर यापूर्वी सिटी चौक ठाण्यातच दोन दुचाकी चोरीचे तर बुलढाण्यात पोक्सोसारखा गंभीर गुन्हा दाखल आहे. पोलिसांनी त्याच्याकडून महाराष्ट्र पोलिसांची बनावट ओळखपत्रे, चार वेगवेगळ्या हुद्द्यांच्या नेमप्लेट, बनावट नियुक्ती पत्र आणि पोलिसांची संपूर्ण अधिकृत किट जप्त केली आहे.

Fraud Case
Sambhajinagar News : देवाच्या जागेतून ६५० कोटींचा मलिदा लाटण्याचा होता डाव

राहुल रोहिदास सातकर (३१, रा. अमडापूर, मेहकर रोड, ता. चिखली, जि. बुलढाणा) असे आरोपीचे नाव असल्याची माहिती पोलिस निरीक्षक सचिन सानप यांनी दिली. अधिक माहितीनुसार, आरोपी राहुल सातकर हा १२ वी नापास असून, यापूर्वी तो वेगवेगळ्या हॉटेलांमध्ये काम करत होता. हॉटेलमधील काम सोडल्यानंतर त्याने लोकांवर प्रभाव पाडण्यासाठी आणि फसवणूक करण्यासाठी तोतयागिरीचा मार्ग निवडला.

विशेष म्हणजे, पोलिसांप्रमाणे हेअरस्टाईल, पिळदार शरीरयष्टी, रुबाबदार चालणे आणि बोलण्यातील तोरा यामुळे तो हुबेहूब खराखुरा पोलिस अंमलदार असल्यासारखाच वावरायचा. त्यामुळे सहजासहजी कोणालाही त्याच्यावर संशय येत नव्हता. त्याने ठाणे शहर पोलिस दलाचे बनावट नियुक्ती पत्र, विविध क्रीडा व शैक्षणिक प्रमाणपत्रे तयार करून घेतली होती. २७ सप्टेंबर रोजी मध्यरात्री तो सिटीचौक परिसरातील सिटीझन हॉटेल (लॉज) येथे आला.

मी ठाणे पोलिस दलात असून खेळाच्या स्पर्धेसाठी शहरात आलो आहे, असा बहाणा करत त्याने गळ्यात महाराष्ट्र पोलिसांची लेस असलेले ओळखपत्र दाखवून लॉजमध्ये खोली मिळवली. गेल्या दहा दिवसांपासून तो या लॉजवर ठाण मांडून शहरात वावरत होता. दरम्यान, त्याच्या संशयास्पद हालचालीबाबत सिटीचौक पोलिसांना माहिती मिळाली.

Fraud Case
एसटी : आपसी कर्तव्य बदलाला लगाम; लाडक्या कर्मचाऱ्यांची तारांबळ

पथकाने सिटीझन लॉजवर जाऊन त्याला ताब्यात घेतले आणि पोलिसी खाक्या दाखवत विचारपूस करताच त्याचा बनाव उघड झाला. तोतयागिरी करून खाकीचा रुबाब दाखवण्यासाठी आणि फसवणुकीच्या हेतूने हे सर्व करत असल्याची कबुली त्याने दिली. ही कारवाई पोलिस निरीक्षक सचिन सानप, सहायक निरीक्षक मनोज शिंदे, उपनिरीक्षक संजय राठोड, मुनीर पठाण, हेडकॉन्स्टेबल आनंद वाहुळ, अंमलदार मंगेश पंडित, संदीप भोटकर यांनी केली.

शिपाई ते हवालदार... ४ नेमप्लेटसह संपूर्ण किट जप्त

त्याच्या खोलीची झडती घेतली असता पोलिसांना लागणारी संपूर्ण किट आणि साहित्याचा मोठा साठा आढळून आला. यामध्ये एकाच नावाच्या राहुल संगिता रोहिदास सातकर (न.प्र.पो.शि. ठाणे शहर), (पो.शि. ८१६२ ठाणे शहर), (पो. हवा. ८१६२ ठाणे शहर) आणि महाराष्ट्र पोलिस लोगो असलेली पो. हवालदार अशा चार वेगवेगळ्या नेमप्लेट. पोलिसांची लेस असलेली २ बनावट ओळखपत्रे, पूर्ण खाकी वर्दी, लायनाड, पोलिस डांगरी ड्रेस, महाराष्ट्र पोलिस ट्रॅक सूट, अधिकृत पिवळा रेनकोट, कमांडो आणि क्यूआरटीचे टी-शर्ट आणि कमरेचे पिस्तूल पाऊच. पोलिसांच्या कॅप, परेड अँकलेट, हँडग्लोव्हज, बेल्ट, बूट, दोन मोबाईल, ट्रॉली बॅग आणि बनावट कागदपत्रांची फाईल आढळून आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news