Sambhajinagar News
Sambhajinagar News : कंत्राटी कामगार पुरवठ्यासाठी मनपा नवी एजन्सी नियुक्त करणार File Photo

Sambhajinagar News : कंत्राटी कामगार पुरवठ्यासाठी मनपा नवी एजन्सी नियुक्त करणार

निविदा प्रक्रिया सुरू, जुन्या एजन्सीचे काय होणार ?
Published on

Municipal Corporation to appoint new agency for supply of contract labor

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : महापालिका कंत्राटी कामगार पुरवठ्यासाठी नवीन एजन्सी नियुक्त करण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी प्रशासनाच्या वतीने निविदा प्रक्रिया करण्यात आली असून लवकरच एजन्सीची नियुक्त करण्यात येणार आहे. मात्र, चौकशी सुरू असलेल्या जुन्या एजन्सींचे काय होणार, असा सवाल उपस्थित होत आहे.

Sambhajinagar News
घृष्णेश्वर मंदिरात प्रवेशावरून वाद; पहिल्या श्रावण सोमवारीच सुरक्षा रक्षकाला मारहाण

महापालिकेच्या विविध विभागांतून प्रत्येक महिन्यात सुमारे २० ते ३० अधिकारी-कर्मचारी सेवानिवृत्त होत आहेत. त्यातुलनेत मागील दोन दशकांत महापालिकेत मेगा कर्मचारी भरती झाली नाही. त्यामुळे महापालिकेत रिक्तपदांची संख्या वाढली असून विविध विभागांतील लिपिक व कर्मचाऱ्यांवर कामाचा भार वाढला आहे.

महापालिकेचे कामकाज सुरळीत चालावे, यासाठी प्रशासनाने कंत्राटी कामगार पुरवठ्यासाठी एजन्सींची नियुक्ती केली आहे. यात महाराणा सेक्युरिटी एजन्सी, गॅलेक्सी एजन्सी आणि अशोका एजन्सी या तीन एजन्सींच्या वतीने विविध विभागांसाठी कंत्राटी कामगार घेण्यात आले आहेत. या कंत्राटी कर्मचाऱ्यांची संख्या आता ३ हजारांवर पोहचली आहे.

Sambhajinagar News
Sambhajinagar News : नव्या मुख्य जलवाहिनीतून ऑक्टोबरपासून पाणीपुरवठा

दरम्यान, या एजन्सींना मागील काही काळात जास्तीची देयके अदा करण्यात आली होती. हा प्रकार प्रशासक जी. श्रीकांत यांनीच उजेडात आणला होता. त्यावरुन प्रशासकांनी तिन्ही एजन्सींना नोटीस बजावून त्यांच्याकडून जास्तीचे देयक वसूल करण्याचा निर्णय घेतला होता.

त्यानुसार महाराणा एजन्सी, अशोका आणि गॅलेक्स एजन्सीला नोटीस बजावण्यात आली होती. त्यांच्या कागदपत्रांची चौकशी देखील सुरू करण्यात आली होती. मात्र, ही चौकशी सुरू असतानाच प्रशासक जी. श्रीकांत यांनी आता नव्याने कंत्राटी कामगार पुरवठादार एजन्सी नियुक्तीचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी निविदाही काढण्यात आली आहे. लवकरच या निविदेनुसार नवीन एजन्सी नियुक्त केली जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, या जुन्या एजन्सींच्या चौकशीचे काय, असा सवाल उपस्थित होत आहे.

महिला बचतगटांचे काय ?

महापालिका प्रशासक जी. श्रीकांत यांनी कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाच्या तक्रारीनंतर बहुतांश कंत्राटी कर्मचारी महिला बचत गटाकडे वर्ग केले होते. तर महारणा एजन्सीकडील काही कर्मचारी अशोका एजन्सीकडे वर्ग केले होते. मात्र, आता महापालिका नव्या निविदा प्रक्रियेत बचत गटाला प्राधान्य देणार की जुन्यांनाच संधी देणार, हे अद्यापही अस्पष्ट आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news