Chhatrapati Sambhajinagar : अखेर रंगारगल्लीने घेतला मोकळा श्वास

धोकादायक इमारतींसह २५ मालमत्ता भुईसपाट, मनपाची १३ वर्षांनंतर कारवाई
Chhatrapati Sambhajinagar
Chhatrapati Sambhajinagar : अखेर रंगारगल्लीने घेतला मोकळा श्वासFile Photo
Published on
Updated on

Municipal Corporation takes action against dangerous buildings in Chhatrapati Sambhajinagar city

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहराच्या मुख्यबाजारपेठेत असलेला रंगारगल्ली ते सिटी चौक रस्ता रुंदीकरणाआड येणाऱ्या धोकादायक इमारतींसह २५ मालमत्तांवर मंगळवारी (दि. २४) महापालिकेने जेसीबी चालवून जमीनदोस्त केल्या. त्यामुळे तब्बल १३ वर्षांनंतर रंगारगल्लीने मोकळा श्वास घेतला आहे.

Chhatrapati Sambhajinagar
Sambhajinagar News : संभाजीनगरात सहा कंपन्यांकडून बाराशे कोटींची गुंतवणूक

शहराच्या मुख्य बाजारपेठेतील पैठणगेट ते गुलमंडी व पुढे गुलमंडी-रंगारगल्ली ते सिटी चौक, औरंगपुरा ते अंगुरी बाग, सिटी चौक ते पैठणगेट, गांधी पुतळा ते जुनाबाजार या प्रमुख मार्गावर २०१२ साली महापालिकेने धडक मोहीम राबवून रस्तारुंदीकरणाआड असलेल्या सुमारे दीड हजारांहून अधिक मालमत्ता भुईसपाट केल्या होत्या.

या कारवाईतही एकमेव रंगारगल्ली ते सिटी चौक येथील काही मालमत्तांवर कारवाई झाली नाही. महापालिकेने मागील १३ वर्षांत अनेकवेळा या मार्गावरील उर्वरित मालमत्ता काढण्याची मोहीम राबवली होती. मात्र प्रत्येकवेळा प्रशासनाला माघार घ्यावी लागली. दरम्यान, गेल्या तीन आठवड्यांपासून महापालिकेने धोकादायक इमारती आणि विकास आराखड्यातील रखडलेल्या रस्त्यांवरील अतिक्रमण काढण्यासाठी प्रशासनाने धडक मोहीम सुरू केली आहे.

Chhatrapati Sambhajinagar
MD Drugs Business : फार्मा कंपन्यांमधील कचऱ्यातील पावडरपासून एमडी ड्रग्सचा धंदा

या मोहिमेअंतर्गत मंगळवारी प्रशासक जी. श्रीकांत यांच्या आदेशावरून महापालिका अतिक्रमण हटाव पथकाने रंगारगल्लीमधील धोकादायक इमारतीविरोधात कारवाई केली. यात इमारत मालक दूरचंद कल्लूराम मेघावाले यांची नगर भूमापन क्रमांक ४३८८ मधील बारा बाय पंधरा आकाराची इमारत पाडण्यात आली. ही इमारत अतिशय जीर्ण व धोकादायक झाल्याने महापालिकेने कारवाई केली.

याशिवाय, सुमारे २५ अतिक्रमण काढण्यात आले. त्यामुळे हा मार्ग मोकळा झाला असून, लवकरच महापालिका रस्त्याचे काम सुरू करणार आहे. ही कारवाई मनपाचे अतिरिक्त आयुक्त तथा अतिक्रमण नियंत्रण अधिकारी संतोष वाहुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त रमेश मोरे, सहायक आयुक्त सविता सोनवणे, सहाय्यक आयुक्त संजय सुरडकर, अतिक्रमन निरीक्षक सय्यद जमशेद, मुकेश खडसे, मजहर अली, रवींद्र देसाई, नागरी मित्र पथकाचे प्रमुख प्रमोद जाधव यांच्यासह कर्मचारी सहभागी होते.

धोकादायक इमारतीला नोटीस

महापालिका प्रशासनने दरवर्षी धोकादायक इमारतींना नोटीस देऊन मालमत्ताधारकांना स्वतःहून बांधकाम काढून घेण्याची सूचना करते. गेल्याच महिन्यात शहरातील धोकादायक मालमत्तांना नोटीस दिल्या आहेत. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे, असे सहाय्यक आयुक्त रमेश मोरे व संजय सुरडकर यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news