Sambhajinagar News : मनपाकडून १२ मालमत्ता सील, एकाच दिवसात ५४ लाखांची वसुली

नोटिसा बजावूनही मालमत्ता कराची थकबाकी न भरणाऱ्या बड्या थकबाकीदारांविरुद्ध महापालिकेने गुरुवारी (दि.८) शहरभर जप्तीची मोहीम राबविली.
Sambhajinagar News
Sambhajinagar News : मनपाकडून १२ मालमत्ता सील, एकाच दिवसात ५४ लाखांची वसुलीfile photo
Published on: 
Updated on: 

Municipal Corporation seals 12 properties; recovers ₹54 lakh in a single day

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा नोटिसा बजावूनही मालमत्ता कराची थकबाकी न भरणाऱ्या बड्या थकबाकीदारांविरुद्ध महापालिकेने गुरुवारी (दि.८) शहरभर जप्तीची मोहीम राबविली. आयुक्त अमोल येडगे यांच्या आदेशाने दहा झोन कार्यालयांच्या पथकांनी एकाचवेळी केलेल्या कारवाईत १२ मालमत्ता सील करण्यात आल्या.

Sambhajinagar News
Sambhajinagar News : गव्हाली तांडा येथे नापिकी, दुष्काळाच्या विवंचनेत शेतकऱ्याने जीवन संपवले

कारवाईचा धसका घेत अनेक थकबाकीदारांनी जागेवरच कराचा भरणा केल्याने एका दिवसात तब्बल ५४ लाख ३७हजार रुपयांची वसुली झाली. या मोहिमेंतर्गत आयुक्तांच्या आदेशानुसार व्यावसायिकांसह निवासी मालमत्तेच्या काही भागावर टाच आणली जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. महापालिकेने आता करवसुलीची मोहीम अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यानुसार दर गुरुवारी आणि शुक्रवारी थकबाकीदारांच्या मालमत्तांवर जप्तीची कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे नोटीस देऊनही कर भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या मोठ्या थकबाकीदारांच्या मालमत्तांवर थेट जप्तीची कारवाई करण्यात आली. अतिरिक्त आयुक्त कल्पिता पिंपळे आणि कर निर्धारक व संकलक उपायुक्त विकास नवाळे यांच्या सूचनेनुसार सर्व दहा झोनमधील पथकांनी ही कारवाई केली.

मनपाकडून दर गुरुवारी आणि शुक्रवारी थकबाकीदारांच्या मालमत्तांवर जप्तीची कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे नोटीस मिळूनही कर न भरणाऱ्या मालमत्ताधारकांवर पुढील काळात कारवाईची टांगती तलवार कायम राहणार आहे. या मोहिमेत निवासी मालमत्तांच्या थकबाकीदारांवर कारवाई करताना संपूर्ण घर सील न करता घरातील किमान एक खोली किंवा अन्य स्थावर जंगम मालमत्ता सील केली जाणार आहे. यासाठी वॉर्डनिहाय थकीत करधारकांची यादी तयार करण्यात आली आहे.

Sambhajinagar News
Cannabis plantation : कचनेर तांड्यावर गांजाची शेती उद्ध्वस्त
थकबाकीदारांची यादी तयार वॉर्डनिहाय थकीत करधारकांची यादी तयार केली आहे. आयुक्तांच्या आदेशानुसार व्यावसायिकांसह निवासी मालमतेचा काही भाग सील करून बोजा चढविणे आणि जप्तीची कारवाईही केली जाणार आहे. नागरिकांनी थकीत कर भरून कारवाई टाळावी.
विकास नवाळे, उपायुक्त

कारवाई सुरूच, वसुलीलाही वेग

मनपा पथकाकडून गुरुवारी राबवण्यात आलेल्या मोहिमेत झोननिहाय मालमत्ता सील करण्याबरोबरच अनेक थकबाकीदारांकडून जागेवरच कराची वसुली करण्यात आली. झोन १ मध्ये तीन थकबाकीदारांकडून २०.७२ लाख, झोन ३ मध्ये दोन जणांकडून १.०६ लाख, झोन ५ मध्ये ५० हजार, झोन ६ मध्ये दोन जणांकडून १.५० लाख, झोन ७ मध्ये २.३९ लाख, झोन ८ मध्ये दोन जणांकडून ४.०१ लाख आणि झोन ९ मध्ये १.१९ लाख रुपये वसूल करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news