Cannabis plantation : कचनेर तांड्यावर गांजाची शेती उद्ध्वस्त

शेतात २७ लाखांचा १८२ किलो गांजा जप्त
Cannabis plantation
Cannabis plantation : कचनेर तांड्यावर गांजाची शेती उद्ध्वस्तfile photo
Published on: 
Updated on: 

Cannabis plantation destroyed at Kachner Tanda

आडुळ, पुढारी वृत्तसेवा : कचनेर तांडा क्र. ५ शिवारातील शेतात चिकलठाणा पोलिसांनी गुरुवारी (दि.आठ) पहाटे मोठी कारवाई करत गांजाची शेती उद्ध्वस्त केली. बेकायदेशीररीत्या लागवड केलेला तब्बल १८२ किलो गांजाची झाडे जप्त केली. आंतरराष्ट्रीय बाजारभावानुसार याची सुमारे २७ लाख ३० हजार ३०० रुपये किंमत आहे. या प्रकरणी संबंधित शेतजमीन धारकांविरुद्ध अमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Cannabis plantation
Crime News : सासूच्या अंगावर दुचाकी घालून ठार मारण्याचा प्रयत्न

मिळालेल्या माहितीनुसार, कचनेर तांडा क्र. ५ मधील शेत गट क्रमांक १३९ आणि १४१ मध्ये इतर पिकांच्या आडून मोठ्या प्रमाणावर गांजाची बेकायदेशीर लागवड करण्यात आल्याची माहिती चिकलठाणा पोलिसांना मिळाली होती. या माहितीची खात्री पटल्यानंतर पोलिसांनी तातडीने नियोजनबद्ध सापळा रचला.

पोलिस अधीक्षक प्रकाश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली चिकलठाणा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेंद्र बनसोडे यांच्या नेतृत्वात ३ अधिकारी आणि १५ अंमलदारांच्या पथकाने पहाटेच्या सुमारास संशयित शेतावर अचानक छापा टाकला.

Cannabis plantation
Knife attack : पोलिसावर तरुणीने केले चाकूने सपासप वार

शोधमोहिमेदरम्यान शेतातून २४१ गांजाची हिरवी झाडे उपटून काढण्यात आली. मोजदाद केली असता या झाडांचे एकूण वजन १८२.०२ किलोग्रॅम भरले. पोलिसांनी संपूर्ण मुद्देमाल जप्त करून आरोपींविरोधात चिकलठाणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news