Sambhajinagar News : मनपा अधिकाऱ्यांचा परदेश दौरा रद्द

अभ्यासासाठीच्या जर्मनी वारीला ब्रेक : ४० लाखांचा वाचला खर्च
Chhatrapati Sambhajinagar
Sambhajinagar News : मनपा अधिकाऱ्यांचा परदेश दौरा रद्दFile Photo
Published on
Updated on

Municipal Corporation Officials' Foreign Tour Cancelled

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : महापालिकेच्या चार वरिष्ठ अधिकाऱ्यांचा १५ ते २३ मेदरम्यान प्रस्तावित जर्मनी अभ्यास दौरा रद्द करण्यात आला असल्याची माहिती नी बुधवारी (दि. १३) मनपा आयुक्त ब अमोल येडगे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. या निर्णयामुळे ना महापालिकेचा लाखो रुपयांचा खर्च री वाचणार आहे. राज्य शासनाच्या निर्देशानुसार आयुक्तांनी हा निर्णय घेतला असल्याची माहती सूत्रांनी दिली.

Chhatrapati Sambhajinagar
Chhatrapati Sambhajinagar : तिजोरीवर कर्जाचे ओझे, तरी मनपा अधिकाऱ्यांचे परदेश दौरे

महापालिकेकडून डिझास्टर मॅनेजमेंट तथा स्मार्ट सिटी कॅपॅसिटी री बिल्डिंग प्रोग्राम अंतर्गत भूकंप आणि सुनामी अभियांत्रिकी व्यवस्थापनासंदर्भातील अभ्यासासाठी जर्मनी येथे अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. या दौऱ्यासाठी नगररचना उपसंचालक मनोज गर्जे, उपायुक्त अंकुश पांढरे, कार्यकारी अभियंता बाळासाहेब शिरसाट आणि नगररचनाकार कौस्तुभ भावे यांची निवड करण्यात आली होती.

या परदेश अभ्यास दौऱ्यास प्रशासनाने नुकतीच मंजुरी दिली होती. संबंधित दौऱ्यावर सुमारे ४० लाख रुपयांहून अधिक खर्च अपेक्षित होता. मात्र शासनाच्या नव्या आदेशानंतर हा दौरा रद्द करण्यात आल्याने मनपाच्या आर्थिक खर्चावरही नियंत्रण आले आहे.

Chhatrapati Sambhajinagar
Plastic-Free City : प्लास्टिकमुक्त शहरासाठी मनपाची जनजागृती मोहीम

दरम्यान शहरात आतापर्यंत ३.३ रिश्टर स्केलपेक्षा मोठा भूकंप झालेला नाही. तसेच शहराच्या आसपास समुद्र नसल्याने त्सुनामीचा प्रश्नच नव्हता. तरी देखील महापालिकेचे चार अधिकारी या अभ्यास दौर्यासाठी रवाना होणार होते. मात्र राज्य शासनाने सर्व शासकीय परदेश दौरे स्थगित करण्याचे निर्देश दिल्यानंतर मनपा प्रशासनानेही तातडीने या निर्णयाची अंमलबजावणी केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news