मनपा आयुक्तांकडून उभरत्या छोट्या गायकाला पियानोची भेट

महापालिकेच्या शिक्षण विभागाकडून राबवण्यात येत असलेल्या स्मार्ट स्कूल टू बेस्ट स्कूल या उपक्रमातून घडणाऱ्या यशकथांचा आणखी एक प्रेरणादायी अध्याय समोर आला आहे.
sambhajinagar news
मनपा आयुक्तांकडून उभरत्या छोट्या गायकाला पियानोची भेटfile photo
Published on
Updated on

Municipal Commissioner Gifts a Piano to an Emerging Young Singer

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : महापालिकेच्या शिक्षण विभागाकडून राबवण्यात येत असलेल्या स्मार्ट स्कूल टू बेस्ट स्कूल या उपक्रमातून घडणाऱ्या यशकथांचा आणखी एक प्रेरणादायी अध्याय समोर आला आहे. मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांनी इयत्ता दुसरीतील विद्यार्थी दानिश शेख यांच्या शंभूनगर येथील घरी जाऊन त्याला पियानो भेट देत कौतुकाचा अनोखा सन्मान केला.

sambhajinagar news
12th Board Exam : विद्यार्थिनीचा मोबाईल नंबर मागणाऱ्या पर्यवेक्षकास नातेवाईकांनी बदडले

सिम्फनी ऑफ सीएसएमसी स्कूल बँड या उपक्रमातून पुढे आलेल्या दानिशच्या गाण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. या व्हिडिओला लाखो लोकांनी प्रतिसाद दिला असून दानिशच्या कौशल्याची दखल सर्वत्र घेतली गेली.

ही बाब समजताच आयुक्त जी. श्रीकांत यांनी रमजान ईदच्या निमित्ताने शंभूनगर परिसरातील त्याच्या साध्या घराला भेट दिली. अत्यंत अरुंद गल्लीत पायी चालत पोहोचलेल्या आयुक्तांनी दानिशला पियानो भेट देत त्याच्या कलागुणांना प्रोत्साहन दिले. या अनपेक्षित भेटीमुळे दानिशच्या कुटुंबाचा आनंद गगनात मावेनासा झाला.

sambhajinagar news
Sambhajinagar News : इस्त्रो सहलीसाठी नऊ तालुक्यांमधून तब्बल ९२ विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा

दारिर्धाच्या हलाकीच्या परिस्थितीतही मुलाच्या यशाने भारावलेल्या त्याच्या वडिलांच्या डोळ्यांत यावेळी आनंदाश्रू तरळले. या भेटीदरम्यान आयुक्तांनी दानिशकडून गाणेही ऐकले. त्याच्या सहज, निरागस सादरीकरणाने उपस्थित सर्वजण भारावून गेले. यावरून विद्यार्थ्यांमधील गुणांना योग्य दिशा दिल्यास ते कसे फुलू शकतात, याचे हे जिवंत उदाहरण ठरले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news