MSRTC NCMC card issues : तुम्हीच सांगा तिकीट द्यायचे कसे? स्मार्ट कार्डचा पहिल्याच दिवशी फज्जा

पुरुषांच्या कार्डवर महिलेचा संवर्ग; ४५ वर्षांची महिला थेट अमृत ज्येष्ठ यादीत ! रिचार्ज करूनही बॅलेन्स शून्य
MSRTC NCMC card issues
कार्ड पुरुषांचे त्याचा संवर्ग महिलेचा असल्याचे स्पष्ट दिसत आहे.pudhari photo
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर : सवलतधारकांच्या तिकीट प्रणालीत सुधारणा आणि पारदर्शकता आणण्यासाठी एसटीने एनसीएमसी कार्ड - मंगळवारपासून (दि.१) अनिवार्य केले आहे. पहिल्याच व दिवशी या कार्डमध्ये अनेक चुका असल्याने - सवलतधारकांना तिकिटाचे पूर्ण पैसे मोजावे लागले. एवढेच नाही तर टॉप अप मारणे, तसेच कार्ड रिचार्ज करूनही बॅलेन्स मात्र शून्य दाखवणे, पुरुषांच्या कार्डवर महिला संवर्ग तर ४५ वर्षांची महिला अमृत ज्येष्ठांच्या संवर्गात अशा गोंधळात पहिला दिवस गेला.

एसटीच्या वतीने महिला व ज्येष्ठ नागरिकांना अर्धे तिकीट तसेच अमृत ज्येष्ठांना मोफत प्रवास आदी सुविधा आहेत. यासाठी मंगळवारपासून एसटीचे स्मार्ट कार्ड -. अनिवार्य करण्यात आले आहे. या कार्डात अनेक चुका असल्याने वाहकांची चांगलीच दमछाक होत आहे. टॉप अप मारल्यानंतरही रिचार्ज केले तरी त्याचे बॅलेन्स शून्य दाखवत असल्याने त्या सवलतधारक प्रवाशांना तिकिटाचे पूर्ण पैसे मोजावे लागले.

MSRTC NCMC card issues
Sambhajinagar Traffic News : शहरात हेल्मेट सक्तीच्या पहिल्याच दिवशी तब्बल चार हजार दुचाकीस्वारांवर कारवाई

कार्डवर टॉप अप मारण्याची यंत्रणाच ठप्प झाली. त्यात सकाळपासूनच एरर येत असल्याने तिही प्रक्रिया बंद पडली. दरम्यान पुढे जाऊन कार्डावर पुरुषांचे नाव पत्ता त्याचा संवर्ग मात्र महिला सन्मान योजनेचा असल्याने ते तिकीट द्यायचे कसे हा प्रश्न वाहकांसमोर पडला, त्यामुळे वाहक प्रवाशांत अनेक कारणांवर वाद झाला.

४५ वर्षांची महिला अमृत ज्येष्ठाच्या संवर्गात

कार्डवर महिलांसाठी एमएसवाय, ज्येष्ठांसाठी-सीटीवाय तर अमृत ज्येष्ठांसाठी एससीवाय अशा नोंदणी संवर्गात करण्यात येते. त्यात पुरुषाच्या कार्डावर एमएसवाय संवर्ग तर ४५ वर्षीय महिलेच्या कार्डवर एससीवाय अशा संवर्गाची नोंद आहे. ही चुकीची नोंद असल्याने तिकीट मशीनमधून त्या त्या प्रवर्गाचे तिकीट निघण्यास अडचणी येत आहेत.

पूर्ण पैसे मोजावे लागले

चुकीच्या नोंदीमुळे सवलतधारकांना पहिल्याच दिवशी झटका बसला असून अनेकांनी पूर्ण पैसे प्रवास करावा लागला तर अनेकांनी प्रवास करणेच टाळले. तर अनेकांनी वाहकांसोबत वाद घातला. दरम्यान दुपारपर्यंत टॉप अपची अडचण दूर करण्यात आल्याची माहिती विभाग नियंत्रक प्रमोद नेहूल यांनी दिली.

MSRTC NCMC card issues
Sambhajinagar Crime | समृद्धी दरोडा प्रकरण : दोन पोलिस कर्मचाऱ्यांची तडकाफडकी उचलबांगडी

अधिकाऱ्यांनाही सुचेना

दरम्यान पहिल्या दिवशी नेमक्या काय अडचणी आल्या याची माहितीच अधिकाऱ्यांना नव्हती, कार्डात एवढ्या अडचणी येत असतील तर त्या कार्ड कंपनीने सोडवायच्या का वरिरीष्ठ पातळीवर सोडवायच्या याबाबत अधिकारी ठोस निर्णय घेऊ शकले नव्हते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news