Paithan News : जिल्ह्याच्या राजकारणात खासदार संदीपान भुमरेच ठरले धुरंधर

चेअरमनपदासाठी आ. विलास भुमरे यांचे नाव आघाडीवर
Paithan News
Paithan News : जिल्ह्याच्या राजकारणात खासदार संदीपान भुमरेच ठरले धुरंधरfile photo
Published on
Updated on

MP Sandipan Bhumre has become a powerful figure in district politics

दादासाहेब गलांडे

पैठण : छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत महायुतीने महाविकास आघाडीवर दणदणीत विजय मिळवत सहकार क्षेत्रातील आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीचा केवळ एकच संचालक विजयी झाला असून, महायुतीचे १९ संचालक निवडून आले आहेत. त्यामधे शिवसेनेचे तब्बल नऊ संचालक निवडून आले आहेत. विशेष म्हणजे पैठण तालुक्यातून प्रथमच तीन संचालक निवडून आले आहेत. जिल्ह्याच्या राजकारणात तालुक्याचे राजकीय व सहकार क्षेत्रातील वजन वाढल्याची चर्चा आहे. या विजयामागे जिल्ह्याच्या राजकारणातील धुरंदर नेतृत्व खासदार संदीपान भुमरे हेच होय.

Paithan News
Chhatrapati Sambhajinagar DCC Bank Election : जिल्हा बँकेत आमदार विलास भुमरे यांची दमदार एन्ट्री

पुढाकार घेऊन महायुतीची प्रभावी निवडणूक रणनीती आणि प्रचाराचे नियोजन करून संपूर्ण जिल्हा पिंजून काढत उमेदवारांच्या प्रचाराची धुरा खासदार संदीपान भुमरे यांनी सांभाळल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. विविध मतदारसंघांत समन्वय साधत त्यांनी महायुतीच्या उमेदवारांना बळ दिल्याने जिल्हा बँकेवर महायुतीची एकहाती सत्ता आली आहे. यामुळे आजपर्यंत कधीच पैठण तालुक्याला बँकेच्या चेअरमन पदाची संधी मिळाली नाही, मात्र आमदार विलास बापू भुमरे यांच्या रूपाने तालुक्याला चेअरमन पदाची संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता जिल्हा बँकेच्या चेअरमन पदाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. चेअरमन पद शिवसेनेकडे जाण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात असून, त्या शर्यतीत पैठणचे आमदार विलास भुमरे यांचे नाव आघाडीवर आहे. अंतिम निर्णय महायुतीच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून होणार असला तरी आमदार भुमरे यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. खासदार संदीपान भुमरे हे जिल्ह्याच्या राजकारणातील अनुभवी नेतृत्व म्हणून ओळखले जाते. आता चेअरमन पदाचा अंतिम निर्णय कोणाच्या बाजूने लागतो, याकडे जिल्ह्याच्या राजकीय व सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

Paithan News
Nanded legislative council election : वि.प.निवडणूक : महायुतीत नांदेडची जागा भाजपाला सुटल्यातच जमा!

भुमरे पॅटर्नची पुन्हा प्रचिती ! सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या पत्नीला केले संचालक राजकारणातील भुमरे यांच्या नेतृत्वाची छाप पुन्हा दिसून आली. पैठण तालुक्यातून तीन संचालक निवडून आले. त्यात आमदार विलास भुमरे बिनविरोध, संचालक रवींद्र काळेंसह मुक्ता तांगडे यांचा समावेश आहे. यात दोन महिन्यांपूर्वीच बँकेतून सेवानिवृत्त झालेले कर्ज अधिकारी श्याम तांगडे यांच्या पत्नी मुक्ता तांगडे याना उमेदवारी देऊन मोठ्या मतांनी निवडून आणले आहे. सहकार क्षेत्रात केवळ पारंपरिक राजकारण्यांनाच नव्हे, तर संस्थेसाठी काम केलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबालाही नेतृत्वाची संधी खासदार भुमरे यांनी दिली आहे.

जिल्ह्यातील महायुतीचे संकटमोचक खा. भुमरे

खासदार संदीपान भुमरे हे राजकारणातील जुने जाणते धुरंदर नेते आहेत. संदीपान भुमरे हे तब्बल २९ वर्षे जिल्हा बँकेचे संचालक राहिले आहेत. त्यांचे सर्वच राजकीय पक्षांत मैत्रीचे संबंध आहेत. पालकमंत्री पदावर असताना त्यांनी सर्वांना न्याय दिलेला आहे. आमदार विलास भुमरे यांना सहकार क्षेत्रातला अनुभव असून, तेही एका कारखान्याचे चेअरमन आहेत. तसेच विधानसभेत जिल्ह्यासह मराठवाड्याचे प्रश्न उपस्थित करत असल्यामुळे त्यांची वेगळी छबी विधानसभेत दिसून येत आहे. यामुळे त्यांचा चेअरमन पदाचा मार्ग सुकर होण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news