संभाजीनगरमधून खासदार जलील हेच एमआयएमचे उमेदवार: ओवीसी यांचे संकेत

संभाजीनगरमधून खासदार जलील हेच एमआयएमचे उमेदवार: ओवीसी यांचे संकेत

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणूक मुंबईतून लढविण्याचा आपला विचार सुरू असल्याचे खासदार इम्तीयाज जलील यांनी गेल्या महिन्यातच जाहीर केले होते. परंतु, एमआयएमचे पक्ष प्रमुख खा. असदुद्दीन ओवीसी यांनी हैदराबाद येथील पञकार परिषदेत महाराष्ट्रातील लोकसभेच्या उमेदवाराबाबत बोलताना छञपती संभाजीनगरमधून आमचे उमेदवार निश्चित आहे, असे सांगून अप्रत्यक्षरित्या खा.जलील यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला आहे. लवकरच अधिकृत यादी जाहीर केली जाणार आहे.

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. भाजपाने दोन याद्या जाहीर केल्यानंतर काँग्रेसनेही आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. माञ, दोन्ही शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसकडून अद्याप एक उमेदवार जाहीर केलेला नाही. परंतु, एमआयएमने महाराष्ट्रातील सहांपैकी एक जागेचा आपला उमेदवार निश्चित असल्याचे पञकार परिषदेत पक्षप्रमुख खासदार ओवेसी यांनी जाहीर केले. सध्या संभाजीनगरची खासदारकी एमआयएमकडे असल्याने तेच उमेदवार असणार हे स्पष्ट होत आहे.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news