Bus Fire Chhatrapati Sambhajinagar: धावत्या बसने पेट घेतला, कार चालकामुळे प्रवाशांचे जीव वाचले

संभाजीनगरहून इचलकरंजीकडे जाणाऱ्या धावत्या बसने अचानक पेट घेतला. ही बाब बसच्या पाठीमागे असलेल्या कारचालकाच्या लक्षात आल्याने त्याने तत्काळ चालकासह प्रवाशांना याची माहिती दिली.
Bus Fire
Bus FireFile Photo
Published on
Updated on

Bus Fire Chhatrapati Sambhajinagar

छत्रपती संभाजीनगर: संभाजीनगरहून इचलकरंजीकडे जाणाऱ्या धावत्या बसने अचानक पेट घेतला. ही बाब बसच्या पाठीमागे असलेल्या कारचालकाच्या लक्षात आल्याने त्याने तत्काळ चालकासह प्रवाशांना याची माहिती दिली. प्रवाशांनी बसमधून उतरून सुरक्षितस्थळी धाव घेतली. ही घटना पांढरी पिंपळगाव येथे शुक्रवारी (दि.१७) सकाळी ८.३० च्या सुमारास घडली.

Bus Fire
Sambhajinagar News : उसाच्या उभ्या ट्रॉलीला धडकून बसचालक ठार

संभाजीनगर ते इचलकरंजी सकाळी आणि सायंकाळी अशा दोन बस रोज धावतात. शुक्रवारी सकाळी ७.३० वाजता इचलकरंजी आगाराची बस क्रमांक एम एच ०९ एफ एल ८१३४ संभाजीनगरहून इचलकरंजीकडे जात असताना पांढरी पिंपळगाव येथे बसमधून धूर निघत असल्याचे पाठीमागून येणाऱ्या कारचालकाच्या निदर्शनास आले. त्यांनी ही माहिती चालकासह प्रवाशांना दिली.

चालकाने बस बाजूला घेतली व प्रवाशी खाली उतरविले. काही प्रवासी संकटकालीन दरवाज्यातून बाहेर काढले. गाडीने अचानकच जास्त पेट घेतल्याने संपूर्ण गाडी जळालेली आहे. बस मध्ये ३८ प्रवासी असून सदर घटनेमध्ये चालक वाहक अथवा कोणत्याही प्रवाशाला इजा झालेली नाही. घटनेची माहिती मिळताच संभाजीनगर येथील यंत्र अभियंता व त्यांचे सहकारी घटनास्थळी रवाना झाले आहेत.

एसटी बस लॉक करून वाहकाची बॅग पळवली

शहरातील मध्यवर्ती बस स्थानकात रात्री बसमध्ये झोपलेल्या एका एसटी वाहकाची (कंडक्टर) बॅग चोरट्याने लंपास केली. ही घटना मंगळवारी (दि.१४) रात्री १० ते ३ वाजेच्या दरम्यान घडली. या बॅगेत एसटी महामंडळाचे २५ हजार रुपयांचे तिकीट मशीन, मोबाईल आणि रोख रकमेसह ३७ हजार ७०० रुपयांचा ऐवज होता. याप्रकरणी बुधवारी (दि. १५) क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी महेंद्र यशवंत चौधरी (४२, रा. कापडणे, ता. जि. धुळे) हे धुळे आगारात वाहक म्हणून कार्यरत आहेत. १४ जुलै रोजी रात्री ते एसटी बसने छत्रपती संभाजीनगरच्या मध्यवर्ती बस स्थानकात आले होते. रात्री १० वाजेच्या सुमारास बसस्थानकात गाडी उभी करून ते आणि त्यांचे सहकारी बसचे दरवाजे आणि खिडक्या आतून लॉक करून बसमध्येच झोपी गेले होते. झोपण्यापूर्वी त्यांनी बॅग बाजूलाच ठेवली होती. मध्यरात्री चोरट्याने बसमध्ये शिरून तिकीट मशीन, चार्जर, मोबाईल, पॉवर बँक, पाकीट, ज्यामध्ये वाहकाचे आधार कार्ड, पॅन कार्ड, लायसन्स आणि ७०० रुपयांची रोख रक्कम असलेली बॅग लंपास केली. पुढील तपास हवालदार इरफान खान करत आहेत.

Bus Fire
Accident News : शाळकरी मुलाला उडवून स्कार्पिओचालक पसार

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news