Salim Ali Lake : सलीम अली परिसर पुन्हा खुला करण्याच्या हालचाली

गणेशोत्सवानंतर मनपाकडून स्वच्छतेला सुरुवात : सांडपाणी रोखण्यासाठी एसटीपी दुरुस्तीचे नियोजन
Salim Ali Lake
Salim Ali Lake : सलीम अली परिसर पुन्हा खुला करण्याच्या हालचालीfile photo
Published on
Updated on

Moves to reopen the Salim Ali complex

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : कोट्यवधी रुपये खर्च करून नूतनीकरण करण्यात आलेला ऐतिहासिक सलीम अली तलाव गेल्या काही वर्षांपासून न्यायालयीन निर्देशांमुळे बंद आहे. तलाव परिसर पुन्हा निसर्गप्रेमी आणि पर्यटकांसाठी खुला करण्याच्या दृष्टीने महापालिकेने हालचाली सुरू केल्या असून महापौर समीर राजूरकर आणि आयुक्त अमोल येडगे यांनी तलाव परिसराची पाहणी केली. या तलावाचे गणेशोत्सवानंतर स्वच्छतेचे काम हाती घेण्यात येणार असून, सांडपाणी रोखण्यासाठी एसटीपी दुरुस्तीचे नियोजन करण्यात येणार आहे.

Salim Ali Lake
Ganeshotsav 2026 : नवनाथांसह प्रेम महलाचे आकर्षण; गणेश मंडळाचे देखावे पाहण्यासाठी भाविकांची गर्दी

त्यानंतर टप्प्याटप्प्याने विकासकामे केली जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. शहरातील सलीम अली तलाव परिसरात देश-विदेशातून येणाऱ्या विविध पक्ष्यांचा वावर असतो. मात्र तलावाच्या बिघडलेल्या स्थितीमुळे पक्ष्यांचे आगमन कमी होण्याची शक्यता व्यक्त करीत निसर्गप्रेमींनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानंतर न्यायालयीन स्थगितीमुळे तलाव परिसर बंद आहे. आता न्यायालयीन निर्देशांचे पालन करीत तलावाची स्वच्छता आणि विकास करून तो पुन्हा नागरिकांसाठी खुला करण्याच्या दृष्टीने महापालिकेने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.

दरम्यान, या तलावाच्या नूतनीकरणासह सांडपाणी रोखण्याबाबत वंचित बहुजन आघाडीच्या नगरसेवकांनी महापौरांकडे प्रस्ताव दिला होता. त्यानंतर महापौर व आयुक्तांनी प्रत्यक्ष पाहणी केली. पाहणीदरम्यान तलावाच्या सद्यः स्थितीचा तसेच परिसरातील सांडपाण्याचा प्रश्न जाणून घेण्यात आला. यावेळी तलावालगतच्या वस्त्यांमधून येणाऱ्या सांडपाण्याच्या वाहिन्या थेट तलावात सोडल्या जात असल्याचे निदर्शनास आले आहे.

Salim Ali Lake
Property Re-survey : शासनाचा लिडारचा प्रस्ताव, मनपाची फेरसर्वेक्षणाची ४० कोटींची निविदा !

त्यामुळे सांडपाणी तलावात जाण्यापासून रोखण्यासाठी जुन्या एसटीपी प्रकल्पाची दुरुस्ती करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच वस्त्यांमधून येणाऱ्या सांडपाण्याच्या वाहिन्या एसटीपीकडे वळविण्यात येणार आहेत. त्यामुळे तलावात थेट सांडपाणी सोडले जाणार नाही. ही कार्यवाही न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करून करण्याचा निर्णय पाहणीदरम्यान घेण्यात आला. यावेळी नगरसेवक अमित भुईगळ, करुणा मेघानंद जाधव, मुजाहेद कुरैशी, अॅड. जुनैद कुरैशी, संजय कांबळे, मतीन पटेल, जाकेर शेख आदी उपस्थित आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news