E-Bus Pass : ई-बसमध्येही मासिक, त्रैमासिक पासची सुविधा

विद्यार्थी, नोकरीनिमित्त अपडाऊन करणाऱ्यांना दिलासा
E-Bus Pass
E-Bus Pass : ई-बसमध्येही मासिक, त्रैमासिक पासची सुविधाFile Photo
Published on
Updated on

Monthly and quarterly pass facility available in e-buses too

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : एसटी महामंडळाकडून विद्यार्थी किंवा नोकरीनिमित्त अपडाऊन करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मासिक त्रैमासिक पासची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ही सुविधा ई-बसमध्ये लागू नव्हती. यालाही नुकतीच परवानगी मिळाली असून, आता ई-बसचा पास मिळणार असल्याची माहिती विभागीय वाहतूक अधिकारी संतोष घाणे यांनी दिली.

E-Bus Pass
Haribhau Bagade : जमावाच्या हल्ल्यातील जखमी गोरक्षकाची राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी घेतली भेट

शिक्षणासाठी शहरात येणाऱ्या विद्यार्थ्यांना तसेच नोकरीनिमित्त परिसरातील गावांत जाणाऱ्या चाकरमान्यांना सवलतीच्या दरात मासिक, त्रैमासिक पासची सुविधा आहे. यात मासिक पासमध्ये २० दिवसांचे पैसे भरून ३० दिवस प्रवास करता येतो, तर त्रैमासिक पासमध्ये ६० दिवसांचे पैसे भरून ९० दिवस प्रवास करण्याची मुभा आहे. ही सुविधा लालपरी व इतर बसमध्ये उपलब्ध होती, परंतु नुकत्याच आलेल्या ई-बसमध्ये ही सुविधा उपलब्ध नव्हती. आता या ई-बसमध्येही पासची सुविधा उपलब्ध झाली आहे.

फरकाची रक्कम द्यावी लागेल

साध्या बसचा किंवा ई-बसचा पास आहे. पासधारक दुसऱ्या बसने प्रवास करत असेल तर त्याला फरकाची रक्कम देऊनच प्रवास करता येणार आहे. त्यामुळे पासधारकांना ज्या बसचा पास काढला आहे, त्या बसमधूनच प्रवास करावा लागणार आहे.

E-Bus Pass
पुणे द्रुतगती महामार्ग जालन्यापर्यंत !

दरम्यान, आता प्रथमच विद्यार्थ्यांसह पासधारकांना वातानुकुलीत बसमधून प्रवास करण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे त्यांच्यात उत्साहाचे वातावरण संचारले आहे.

बसच्या प्रकारानुसार पास

ई-बसमध्ये दोन प्रकारच्या बस आहेत. ९ मीटर आणि १२ मीटर या दोन्ही बसच्या नियमाप्रमाणे पासवर ९ मीटर किंवा १२ मीटर असा उल्लेख राहणार आहे. त्यामुळे ज्या बसचा पास आहे, त्याच बसने प्रवास करणे आवश्यक आहे. अन्यथा त्यांना फरकाची रक्कम द्यावी लागणार असल्याचीही माहिती घाणे यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news