Haribhau Bagade : जमावाच्या हल्ल्यातील जखमी गोरक्षकाची राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी घेतली भेट

रुग्णालयात जाऊन प्रकृतीची केली विचारपूस : धीर देत वाढविले मनोबल
Haribhau Bagade
Haribhau Bagade : जमावाच्या हल्ल्यातील जखमी गोरक्षकाची राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी घेतली भेट File Photo
Published on
Updated on

Governor Haribhau Bagde met the injured cow guard in the mob attack

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : चिकलठाणा भागात जमावाकडून करण्यात आलेल्या हल्ल्यात जखमी झालेल्या गोरक्षक गणेश शेळके यांची राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी गुरुवारी (दि.९) रुग्णालयात जाऊन भेट घेत प्रकृतीची अस्थेवाईकपणे विचारपूस करत धीर दिला.

Haribhau Bagade
Prakash Ambedkar : ओबीसी, एससी, एसटी, मुस्लिमांची मोट बांधणार

पळशी येथील गोरक्षक गणेश शेळके यांच्यावर चिकलठाणा भागात ७ऑक्टोबर रोजी २० ते २५ जणांच्या जमावाने धारदार शस्त्रांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात गोरक्षक शेळके हे गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून, गुरुवारी सायंकाळी राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेत प्रकृतीची अस्थावाईकपणे चौकशी केली.

Haribhau Bagade
Prakash Ambedkar : ओबीसी, एससी, एसटी, मुस्लिमांची मोट बांधणार

तसेच डॉक्टरांकडून उपचाराची माहिती घेत त्यांनी म्हस्के यांच्या लवकर प्रकृतीसाठी शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या धैर्याचे कौतुक केले. याप्रसंगी राज्यपालांसोबत खा. डॉ. भागवत कराड यांचीही उपस्थिती होती. दोन्ही मान्यवरांनी म्हस्के यांच्याशी संवाद साधत त्यांचे मनोबल वाढविले. घटनेबाबत माहिती घेतली. यावेळी रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी, म्हस्के यांचे कुटुंबीय, गोरक्षक संघटनांचे कार्यकर्ते आणि समाजसेवक उपस्थित होते. राज्यपालांच्या भेटीमुळे म्हस्के यांच्या कुटुंबीयांमध्ये आणि समर्थकांमध्ये दिलासा व आत्मविश्वासाचे वातावरण निर्माण झाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news