MLA Rohit Pawar : पंचनाम्यांचा खेळ नको, शेतकऱ्यांना सरसकट ५० हजार रुपये हेक्टरी मदत द्या

आ. रोहित पवार, राजेश टोपे यांनी घेतली शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन भेट
MLA Rohit Pawar
MLA Rohit Pawar : पंचनाम्यांचा खेळ नको, शेतकऱ्यांना सरसकट ५० हजार रुपये हेक्टरी मदत द्याfile photo
Published on: 
Updated on: 

MLA Rohit Pawar: Don't play with Panchnamas, give farmers a lump sum of Rs 50,000 per hectare as aid

आडूळ, पुढारी वृत्तसेवा : सरकारने पंचनाम्यांचा वेळखाऊ खेळ न करता बाधित शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी ५० हजार रुपये आणि शेतमजुरांना प्रति कुटुंब २५ हजार रुपये सरसकट मदत द्यावी असे आमदार रोहित पवार यांनी सांगितले.

MLA Rohit Pawar
Sambhajinagar News : कन्नड तालुक्यातील गौताळ्याच्या कुशीत साकारतेय भव्य रामतीर्थ

पावसाने प्रदीर्घ ओढ दिल्याने आडूळ परिसरातील खरीप हंगाम पूर्णपणे धोक्यात आला असून शेतकरी गंभीर दुष्काळसदृश परिस्थितीचा सामना करत आहेत. या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार आणि माजी मंत्री राजेश टोपे यांनी गुरुवारी (दि. २४) रजापूर, दाभरूळ, आणि आडगाव जावळे परिसरातील शेतांच्या बांधावर जाऊन पिकांच्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली व शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला.

केवळ शासकीय कागदपत्रे आणि कार्यालयात बसून तयार केलेल्या अहवालांवर विसंबून न राहता प्रत्यक्ष परिस्थिती जाणून घेण्यासाठी नेत्यांनी शेतात पाऊल ठेवले. मुरलीधर म्हस्के आणि विनायक गायकवाड यांच्या शेतातील करपलेली कपाशी व सोयाबीन पिकांची पाहणी करत वाढता उत्पादन खर्च आणि उत्पादनातील घटीची माहिती घेतली.

MLA Rohit Pawar
Bidkin News : अति उच्च विद्युत वाहिनी तारांचा धक्का; १३ वर्षीय मुलगा गंभीर भाजला

दरम्यान, दुष्काळी परिस्थिती पाहता विद्यार्थ्यांचे चालू शैक्षणिक वर्षाचे संपूर्ण शुल्क माफ करावे, तसेच भरलेले शुल्क तत्काळ परत करावे, मागील वर्षी जाहीर केलेली प्रति हेक्टरी १७ हजार ५०० रुपयांची पीक विमा भरपाई अजूनही मिळालेली नाही, ती तातडीने खात्यात जमा करावी. कर्जमाफीच्या प्रक्रियेचा वेग वाढवून येत्या आठ दिवसांच्या आत सर्व शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी जाहीर करावी आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.

या दौऱ्यादरम्यान माजी आमदार चंद्रकांत दानवे, प्रदेश उपाध्यक्ष तथा प्रवक्ते डॉ. भीमराव हत्तीअंबीर, जिल्हाध्यक्ष पांडुरंग तांगडे पाटील, प्रदेश सरचिटणीस पंकज बोराडे, राजेश पवार, कुलदीप शिंदे, माजी आमदार संजय वाघचौरे, रविकांत वर्षे, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुशील बोरडे, युवक जिल्हाध्यक्ष अतुल गावंडे, रजापूरचे माजी सरपंच ज्ञानेश्वर शिंदे, छाया योगेश कोठुळे यांच्यासह स्थानिक महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

शेतकऱ्यांच्या व्यथा

पावसाअभावी हातातोंडाशी आलेली पिके वाळून गेली असून खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेला आहे. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न बिकट झाला असून पिण्याच्या पाण्यासाठी विहिरी कोरड्या पडल्या आहेत. दिवसभरात केवळ २ ते २.५ तास वीज मिळते, तर जळालेले रोहित्र (डीपी) बदलण्यासाठी शेतकऱ्यांकडून वसुली केली जात आहे. कर्जमाफी व पीक विम्याचे पैसे अद्याप न मिळाल्याने शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे.

शेतकऱ्यांच्या व्यथा

पावसाअभावी हातातोंडाशी आलेली पिके वाळून गेली असून खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेला आहे. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न बिकट झाला असून पिण्याच्या पाण्यासाठी विहिरी कोरड्या पडल्या आहेत. दिवसभरात केवळ २ ते २.५ तास वीज मिळते, तर जळालेले रोहित्र (डीपी) बदलण्यासाठी शेतकऱ्यांकडून वसुली केली जात आहे. कर्जमाफी व पीक विम्याचे पैसे अद्याप न मिळाल्याने शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news