Paithan Police Station
तरुणाविरुद्ध पैठण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. Pudhari Photo

पैठण येथे लग्नाच्या आमिषाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार; तरुणाला अटक

Chhatrapati Sambhajinagar Crime News | पैठण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Published on

पैठण पुढारी वृत्तसेवा: पैठण येथील एका सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्नाची आमिष दाखवून पळून नेऊन तिच्यावर वसमत येथे अत्याचार करण्यात आला. या प्रकरणी पीडित मुलीच्या तक्रारीवरून तरुणाविरुद्ध पैठण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली.

याबाबत अधिक माहिती अशी की, पैठण शहरातील एका अल्पवयीन सोळा वर्षीय. मुलीला लग्नाचे आमिष दाखवले. त्यानंतर तिला पळवून नेऊन वसमत (जि.हिंगोली) येथील एका घरामध्ये अत्याचार करण्यात आला. याची तक्रार पीडितेने पैठण पोलीस ठाण्यात शुक्रवारी (दि.१८) दिली. पोलीस निरीक्षक संजय देशमुख, सपोनि जनाबाई सांगळे यांनी सदरील आरोपी संकेत संतोष जाधव ( रा.पैठण) याच्या विरुद्ध पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली.

उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सिद्धेश्वर भोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सपोनि जनाबाई सांगळे करीत आहेत.

Paithan Police Station
छत्रपती संभाजीनगर : गांधारी नदीवरील बंधाऱ्यात तरुण बुडाला

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news