Sambhajinagar News : सिडकोतील कचरा ट्रान्सफर स्टेशनच्या कामात एमआयएमचा पुन्हा अडथळा

इम्तियाज जलील यांच्यासह तिघांविरोधात पोलिसांत तक्रार : काम थांबवणे, शिवीगाळीसह धमक्या देत मोबाईल फेकल्याचा आरोप
Sambhajinagar News
सिडकोतील कचरा ट्रान्सफर स्टेशनच्या कामात एमआयएमचा पुन्हा अडथळाFile Photo
Published on
Updated on

MIM Once Again Obstructs Work at CIDCO Waste Transfer Station

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा :

शहरातील एन-१२ हडको परिसरातील घनकचरा हस्तांतरण केंद्रात घुसून काही लोकप्रतिनिधींनी कामात अडथळा आणत कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी एमआयएमचे प्रदे-शाध्यक्ष इम्तियाज जलील, मनपाचे विरोधी पक्षनेते अब्दुल समीर अब्दुल साजीद आणि नगरसेवक काकासाहेब काकडे यांच्याविरोधात सिटी चौक पोलिस ठाण्यात अदखलपात्र (एनसी) गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Sambhajinagar News
विकासकामांना अडथळा आणणाऱ्यांवर गुन्हे दाखल होणार !

याप्रकरणी कंपनीचे कर्मचारी विशाल विलासराव कांबळे (३५) यांनी तक्रार दिली. कांबळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, महापालिकेने घनकचरा संकलन व वाहतूक व्यवस्थेसाठी वेस्टर्न इमर्जनरी कंपनीला कंत्राट दिले आहे.

या कंपनीचे एन-१२ परिसरात बंदिस्त स्वरूपाचे कचरा हस्तांतरण केंद्र कार्यरत आहे. येथे प्रभाग क्रमांक ६, १२, १३ आणि १४ मधील घराघरांतून गोळा करण्यात आलेला कचरा घंटागाड्यांद्वारे आणून थेट हसूल येथील प्रक्रिया केंद्राकडे पाठविण्यात येतो. सन २०१८ पासून ही प्रणाली कार्यान्वित असून, सध्या पूर्णतः यांत्रिक आणि बंदिस्त पद्धतीने कचरा हस्तांतरण केले जाते. तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे, घटनेच्या दिवशी दिवसभर काम सुरळीत सुरू होते.

Sambhajinagar News
Imtiaz Jaleel |इम्तियाज जलील यांना कचऱ्याच्या कंत्राटदाराला ब्लॅकमेल कराचे का?

तसेच दुपारी महापालिका आयुक्त अमोल येडगे यांनीही केंद्राला भेट दिली होती. मात्र सायंकाळी सुमारे ६.५१ वाजता वरील तिघांनी केंद्रावर येऊन काम थांबवण्यास सांगत कर्मचाऱ्यांशी वाद घातल्याचा आरोप आहे. यावेळी शिवीगाळ व धमकावण्याचा प्रकार घडल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. घटनेदरम्यान काही कर्मचारी घाबरून तेथून निघून गेले. तसेच कर्मचारी हार्दिक पांचाळ यांचा मोबाईल हिसकावून फेकून दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या प्रकारामुळे काही काळ केंद्रावरील कामकाज ठप्प झाले होते. दरम्यान, या प्रकरणाची नोंद सिटीचौक पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा म्हणून नोंद करण्यात आली आहे.

एमआयएमचा या केंद्रावर दुसऱ्यांदा गोंधळ

महापालिकेकडून २०१८ पासून एन-१२ येथे कचरा वर्गीकरणाचे केंद्र सुरू करण्यात आलेले आहे. मात्र या ठिकाणी ७ एप्रिल रोजी मशनरी बसविण्याचे काम सुरू असताना पहिल्यांदा एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तीयाज जलील यांच्यासह नगरसेवक व कार्यकर्त्यांनी प्रचंड गोंधळ घातला. ट्रान्सफर स्टेशनच्या कामात अडथळा आणत हे केंद्र बंद करण्याची मागणी केली. त्यानंतर रविवारीदेखील दुसऱ्यांदा जलील यांच्यासह मनपा विरोधी पक्षनेते अब्दुल समीर अब्दुल साजेद आणि नगरसेवक काकासाहेब काकडे यांनी एन-१२ येथील कचरा ट्रान्सफर स्टेशन केंद्रातील कामात अडथळा निर्माण केल्याचे समोर आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news