

Millions of rupees have been wasted over the years in the name of street light repairs in MIDC
राहुल जांगडे
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : पंचतारांकित शेंद्रा एमआयडीसीतील प्रमुख मार्ग सोडले तर बहुतांश रस्त्यांवरील पथदिवे बंद पडलेले आहेत. या दिव्यांच्या दुरुस्तीसाठी दरवर्षी लाखो रुपयांचे टेंडर काढले जाते. मात्र पेटत नाही. गंभीर म्हणजे, उद्योजकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करून आश्वासनांची चालढकल करणाऱ्या ठेकेदारांवर काहीच कारवाई होत नाही. उलट प्रशासनाकडून ठेकेदारांना अभय मिळत असल्याने एमआयडीसीत दुरुस्तीच्या नावाने वर्षानुवर्षे लाखोंची उधळपट्टी सुरू असल्याचा संताप उद्योजकांकडून व्यक्त होत आहे.
शेंद्रा एमआयडीसीत कुठे तुटलेले दिवे, तर कुठे नुसतेच खांब उभे... उघड्या धोकादायक फिटिंग आणि लोंबकळणारी वायर... यामुळे रस्त्यांवर काळाकुट्ट अंधार... असे दयनीय चित्र दररोज संध्याकाळनंतर दिसून येते. येथील वी सेक्टर, डी ब्लॉक, सी ब्लॉक, फूड पार्कसह अनेक अंतर्गत रस्त्यांवरील बहुतांश पथदिवे बंद पडले आहेत. दररोज सायंकाळनंतर रस्त्यांवर अंधाराचे साम्राज्य पसरत असल्याने अपघात, लहान-मोठ्या चोऱ्यांचे प्रकार सुरू झाले आहेत. यामुळे उद्योजकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
वारंवार तक्रारी करूनही दुरुस्ती न झाल्याने धोकादायक उघडी फिटिंग, गंजलेले पोल आणि त्यावर लाईट नाही. उघडे लटकलेली केबल हे चित्र बदललेले नाही. यावरही ठेकेदारावर जबाबदार अधिकाऱ्यांकडून कारवाई होत नसल्याने मनमानी सुरू आहे. याचा नाहक मनस्ताप सहन करावा लागत असल्याने वैतागलेल्या उद्योजकांनी त्यांच्या कंपनीसमोर मोठे लाईट लावले आहेत. प्रत्यक्षात दिवे काही फाईव्ह स्टार नव्हे स्लम औद्योगिक वसाहत दरवर्षी पथदिवे दुरुस्तीसाठी लाखोंचा खर्च करूनही शेंद्रा एमआयडीसीतील बहुतांश रस्त्यांवरील पथदिवे बंद
दुरुस्ती करणारे ठेकेदार, कर्मचारी फिरकेना
गतवर्षी असंसो लाईट्स यांना पथदिवे दुरुस्तीचे कंत्राट देण्यात आले होते. मात्र, तक्रारी करुन उद्योजक थकले तरी पथदिवे सुरू झाले नाही. ५ नोव्हेंबरपासून बिटा इलेक्ट्रिकल यांना वर्कऑर्डर देण्यात आली. मात्र, त्यांचे ठेकेदार, कर्मचारी अद्यापही फिरकेलेले नसल्याचे उद्योजकांनी सांगितले.
२७ लाखांचे टेंडर तरी रस्त्यांवर अंधार
पथदिव्यांच्या दुरुस्तीसाठी गत दोन वर्षांपासून २७ लाखांचे टेंडर काढले जाते. मात्र प्रत्यक्षात पथदिव्यांची दुरवस्था सुधारलेली नाही. दुरुस्तीच्या नावाने ठेकेदार आणि प्रशासन वर्षभर नुसते कागदोपत्रीच दिवे लावत असल्याने एमआयडीसीतील बहुतांश रस्त्यांवर अंधार पसरला आहे, असा संताप उद्योगजगतातून व्यक्त होत आहे