Water Meter : ४७ हजार व्यावसायिक नळांना बसविणार मीटर

मनपा आयुक्त येडगे यांचा निर्णय, शासनाची मंजुरी मिळताच निविदा
Sambhajinagar News
Sambhajinagar News : मनपाकडून आता घरोघरी नळांना बसवले जाणार मीटर File Photo
Published on
Updated on

Meters to be installed on 47,000 commercial water connections

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : महापालिकेने नव्या जलवाहिनीतून शहराला सुरू करण्यासाठी पाणीपुरवठा N युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहे. त्यासोबतच नळांना वॉटर मीटर बसविण्याच्या हालचालींनांही गती दिली आहे. शासनाकडून मंजुरी मिळताच महापालिका प्रशासन या मीटरसाठी निविदा प्रक्रिया राबविणार असून पहिल्यांदा ४७ हजार व्यावसायिक नळांनाच मीटर बसविले जाणार आहे. तर पाणीपुरवठा सुरळीत झाल्यानंतर घरगुती नळांबाबत निर्णय होईल, असे महापालिका आयुक्त अमोल येडगे यांनी सांगितले.

Sambhajinagar News
Sambhajinagar News : ९०० च्या जलवाहिनीतून पूर्ण क्षमतेने पाणी द्या

शहरवासीयांना मागील दोन दशकांपासून कमी दाबाने आणि सातव्या, आठव्या दिवशी पाणीपुरवठा होत आहे. नियमित व दररोज पाणीपुरवठा व्हावा, यासाठी केंद्र व राज्याने अमृत योजनेतून शहरासाठी २७४० कोटी रुपये खर्चाची नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर केली असून या योजनेचे पहिल्या टप्प्यातील काम सध्या अंतिम टप्प्यात आले आहे. या योजनेत व्यावसायिक आणि घरगुती वापराच्या नळांना वॉटर मीटर बसविण्याबाबत नमूद आहे. त्यानुसार आता महापालिकेने प्रक्रिया सुरू केली आहे. शहरात दीड लाख अधिकृत नळ जोडणी आहे. त्यात ४७ हजार व्यावसायिक नळांची संख्या आहे. तर सुमारे १ लाख घरगुती नळ आहेत.

शहरवासीयांना नव्या योजनेतून पाणीपुरवठा नियमितपणे सुरू होताच महापालिका नळांना मीटर बसविण्यास सुरुवात करणार आहे. दरम्यान, याबाबत महापालिका आयुक्त येडगे यांनी सांगितले की, शहरातील व्यावसायिक नळांना सर्वप्रथम वॉटर मीटर बसविण्यात येणार आहे. त्यादृष्टीने तयार सुरू आहे. शासनाकडे याबाबत प्रस्ताव सादर केला आहे. त्यावर महिनाभरात निर्णय होणे अपेक्षीत आहे. व्यावसायिक नळांच्या वॉटर मीटरसाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात येईल, असेही ते म्हणाले. त्यामुळे महिनाभारात शहरातील व्यावसायिक नळांसाठी प्रक्रिया राबविली जाण्याची शक्यता आहे.

Sambhajinagar News
शटडाऊनपूर्वीच १२०० ची जलवाहिनी फुटली

पाणी सुरळीत झाल्यावर घरगुतींना

शहरवासीयांना येत्या जून महिन्यापासून नव्या पाणीपुरवठा योजनेतून वाढीव ४० एमएलडी पाणी देण्याचे नियोजन आहे. हळूहळू पुरवठा वाढविला जाईल. जेव्हा शहरवासीयांना सुरळीत पाणीपुरवठा सुरू होईल. तेव्हा घरगुती नळांना वॉटर मीटर बसविले जाईल, असे आयुक्त अमोल येडगे म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news