Crime News : मंगळसूत्र हिसकावणाऱ्या टोळीला 'मोक्का'चा दणका

मुख्य सूत्रधार अमोल गलाटेसह ६ जणांवर कारवाई
Crime News : मंगळसूत्र हिसकावणाऱ्या टोळीला 'मोक्का'चा दणका
Published on
Updated on

'MCOCA' blow to gang that snatched mangalsutras

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहरात सकाळ, संध्याकाळी बाहेर फिरायला जाणाऱ्या महिलांना लक्ष्य करून मंगळसूत्र, सोनसाखळी हिसकावणाऱ्या टोळीला पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी मोठा दणका दिला आहे. आर्थिक फायद्यासाठी संघटित टोळी बनवून शहरात दहशत माजवणाऱ्या कुख्यात अमोल गलाटेसह टोळीतील ६ सराईत साथीदारांवर थेट 'मोक्का' अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

Crime News : मंगळसूत्र हिसकावणाऱ्या टोळीला 'मोक्का'चा दणका
Chain Snatching : मॉर्निंग वॉक करणाऱ्या महिलेची सोनसाखळी ओरबाडली

या टोळीत ५० पेक्षा अधिक गुन्हे दाखल असलेला कुख्यात अमोल वैजिनाथ गलाटे (मुख्य सूत्रधार), मंगेश वाल्मीक शहाणे, शेख अल्ताफ शेख मुबारक, शेख सिराजुल हक शेख अन्वर अली, अमन महेबूब शेख आणि आदित्य अनिल काळे यांचा समावेश आहे, अशी माहिती गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर यांनी दिली.

Crime News : मंगळसूत्र हिसकावणाऱ्या टोळीला 'मोक्का'चा दणका
Sambhajinagar News : कत्तलीसाठी डांबलेल्या 131 गोवंशाची सुटका

या आरोपींनी आर्थिक फायद्यासाठी एक संघटित गुन्हेगारी टोळी तयार केली होती. रस्त्यावर शुकशुकाट असताना मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या तसेच एकट्या दुकट्या महिलांना हे आरोपी टार्गेट करायचे. त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र, सोनसाखळी ओरबाडायचे. विरोध केला तर चाकू लावून लूटमार करायचे. महिलांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या या टोळीचे पोलिसांनी आता 'मोक्का' लावून कंबरडे मोडले आहे.

या सराईत टोळीविरुद्ध पुंडलिकनगर ठाण्यात जबरी चोरीचे विविध गुन्हे दाखल आहेत. आता या गुन्ह्यांमध्ये मोक्का कायद्याचे कलम समाविष्ट करण्यात आले आहे. या गंभीर प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस आयुक्त मनोज पगारे यांच्याकडे सोपवण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news