Silicon Company Fire : सिलिकॉन कंपनीला भीषण आग, वाळूज येथील घटना, आगीत मशीनरीसह कोट्यवधींचे नुकसान

कंपनीत मोठ्या प्रमाणात सिलिकॉन व इतर रासायनिक रॉ मटेरियल असल्याने उशिरापर्यंत आगीची धगधग सुरू होती
Silicon Company Fire
Silicon Company Fire : सिलिकॉन कंपनीला भीषण आग, वाळूज येथील घटना, आगीत मशीनरीसह कोट्यवधींचे नुकसान File Photo
Published on
Updated on

Massive fire at silicon company, incident at Waluj

वाळूज महानगर, पुढारी वृत्तसेवा : वाळूज येथील सुप्रीम सिलिकॉन कंपनीला सोमवारी (दि. २७) दुपारी अचानक आग लागली. कंपनीत मोठ्या प्रमाणात सिलिकॉन व इतर रासायनिक रॉ मटेरियल असल्याने उशिरापर्यंत आगीची धगधग सुरू होती अभिजित सूर्यवंशी यांची वाळूज औद्योगिक क्षेत्रातील सुप्रीम सिलिकॉन (एच सेक्टर, प्लॉट क्र.५५) या नावाने कंपनी असून या कंपनीत सिलिकॉनचे उत्पादन घेण्यात येते. सोमवारी १२ ते १५ कामगार काम करत होते. दुपारी साडे चार वाजेच्या सुमारास कंपनीत आग लागल्याचे कामगारांना दिसून आले.

Silicon Company Fire
Marathwada University : ...त्या महाविद्यालयांवर विद्यापीठाचा कारवाईचा बडगा

वेळीच त्यांनी कंपनीतील फायर फायरिंगच्या मदतीने आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र कंपनीतील सिलिकॉन तसेच केमिकल रॉ मटेरियलने पेट घेतल्यामुळे क्षणार्धात आगीने रौद्र रूप धारण केल्याचे पाहून कामगारांनी कंपनीतून बाहेर पळ काढला. काही वेळानंतर कंपनीत असलेले केमिकलचे फुटून स्फोट झाल्यासारखा आवाज झाल्याचे प्रत्यक्षदर्शीन सांगितले.

Silicon Company Fire
Railway News : रेल्वेची १५ हजार फुकट्यांवर कारवाई, ऑक्टोबर महिन्यात राबविली विशेष मोहीम

साडेतीन तासानंतर आगीवर नियंत्रण

आगीची माहिती मिळताच एमआयडीसीचे दोन बंब गरवारे एक तसेच खासगी टँकरच्या मदतीने आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले. जवळपास तीन ते साडे तीन तासांच्या परिश्रमानंतर अग्निशमन दलाच्या जवानांना आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. मात्र तोपर्यंत कंपनीतील संपूर्ण मशीनरी व सिलिकॉन मटेरियल जळून भस्मसात झाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news