Railway News
Railway News : रेल्वेची १५ हजार फुकट्यांवर कारवाई, ऑक्टोबर महिन्यात राबविली विशेष मोहीम File Photo

Railway News : रेल्वेची १५ हजार फुकट्यांवर कारवाई, ऑक्टोबर महिन्यात राबविली विशेष मोहीम

त्यांच्याकडून सुमारे ९२ लाखांचा दंड वसूल केला आहे.
Published on

Action taken against 15,000 passengers for free travel on railways

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्त-सेवा : रेल्वेने प्रवास करताना सर्वांनी तिकीट काढूनच प्रवास करावा अशा सूचना वारंवार दिल्या जातात. मात्र असे असतानाही अनेकजण सर्रासपणे विनातिकीट प्रवास करत आहेत. रेल्वे विभागाने ऑक्टोबर महिन्यात विशेष मोहीम राबवून सुमारे १५ हजारांहून अधिक फुकट्या प्रवाशांवर कारवाई करत त्यांच्याकडून सुमारे ९२ लाखांचा दंड वसूल केला आहे.

Railway News
Sambhajinagar News : जैन समाजाचा मूक मोर्चा ठरला लक्षवेधी

सण उत्सव काळात मोठ्या प्रमाणात गर्दी असल्याने या संधीचा फायदा घेत अनेक फुकट विविध मार्गांवर प्रवास करतात. ही बाब लक्षात घेऊन रेल्वेने ऑक्टोबर महिन्यांत विशेष मोहीम राबवून एका महिन्यांत तब्बल १५ हजार ७५९ फुकट्या प्रवाशांवर कारवाई केली. यात प्लॅट फॉर्म तिकिटांचाही समावेश आहे.

तिकीट काढूनच करावा प्रवास

रेल्वेने प्रवास करताना सर्वांनी तिकीट काढूनच प्रवास करावा. अशा सूचना वारंवार देऊनही अनेकजण याकडे दुर्लक्ष करत आहेत. यात दिवसेंदिवस वाढ होत असल्याने रेल्-वेने आता ही कारवाई नियमित सुरू ठेवण्याचे नियोजन केले आहे.

Railway News
Sambhajinagar News : मतदारयाद्यांची होणार बूथनिहाय पडताळणी, जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा

९२ लाखांचा दंड

विनातिकीट प्रवास करणाऱ्यांना रेल्वे विभागाने चांगलाच धडा शिकवला आहे. ऑक्टोबर महिन्यात धडक कारवाई करत महिनाभरात सुमारे १५ हजार ७५९ जणांकडून तब्बल ९२ लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news