Masiya Expo : मसिआ एक्स्पोला दुसऱ्या दिवशीही प्रतिसाद

मराठवाड्याच्या औद्योगिक विकासाला चालना, शेवटचे दोन दिवस
Masiya Expo
मसिआच्या एक्सपोला उद्योजक, विद्यार्थी व नागरिकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत असल्याने येथील प्रत्येक स्टॉलवर गर्दी दिसून येत आहे.pudhari photo
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्याच्या औद्योगिक विकासाला चालना देणाऱ्या मसिआ अॅडव्हान्टेज महाराष्ट्र एक्स्पोला दुसऱ्या दिवशी शुक्रवारी (दि.९) उद्योजकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. प्रदर्शनात उद्योग, स्टार्टअप्स, नवतंत्रज्ञान व रोजगारनिर्मतिी, या विषयावर आधारित विविध परिसंवाद, मार्गदर्शन सत्रे व बीटूबी बैठकींमुळे संपूर्ण परिसर उद्योगमय झाला.

महाराष्ट्रासह पर राज्यातील विविध इंडस्ट्रियल असोसिएशनच्या पदाधीकाऱ्यांनी या प्रदर्शनास भेट दिली आणि मसिआच्या कार्याचे कौतुक केले. जसे की, नागपुर बुटी बोरी इंडस्ट्रियल असोसिएशन, लुधीयाना पंजाब याबरोबरच टाटा मोटर्स, जेएसडब्ल्यू, वर्लपूल, टॅफेसह विविध कंपनीच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी भेट दिली. दिवसभरात विविध विषयांचे सेमिनार तसेच बीटूबी कार्यक्रम आयोजित करण्यात आले.

Masiya Expo
Minor Sexual Assault Case : अल्पवयीन भाच्यावर अत्याचार, मामीचा अटकपूर्व जामीन फेटाळला

प्रदर्शनातील विविध स्टॉल्सना उद्योजक, व्यापारी व औद्योगिक प्रतिनिधींनी मोठ्या प्रमाणावर भेटी दिल्या. बीटूबी बैठकींमधून संभाव्य व्यावसायिक करार, टाय-अप्स व सहकार्याच्या संधी निर्माण होणार आहेत. संयोजक अनिल पाटील व चेतन राऊत यांनी स्थानिक उद्योजकांना राष्ट्रीय स्तरावर पोहोच वणे आणि रोजगारनिर्मतिीला गती देणे हा असल्याचे सांगून दररोज विविध विषयांतील तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभत आहे. दुसऱ्या दिवसाच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्व समिती सदस्य, स्वयंसेवक व मसिआ टीमचे कौतुक केले.

Masiya Expo
Parbhani Municipal Election : ठराविक मुद्द्यांभोवतीच फिरतेय मनपा निवडणूक

उद्योगांसाठी नव्या संधी - गायकवाड

मसिआचे अध्यक्ष अर्जुन गायकवाड म्हणाले, एक्सपोचा प्रत्येक दिवस हा उद्योगांसाठी नव्या संधी घेऊन येत आहे. उद्योजकांनी या प्रदर्शनाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा व मराठवाड्याच्या औद्योगिक प्रगतीत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहनही केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news