

कन्नडः शहरात शिवसेना ठाकरे गटाचे वतीने शहरातील स्वच्छता, पाणी प्रश्न, पथदिवे, मोकाट जनावरे, व नागरी सुविधा यासाठी ३०डिसेंबर रोजी तहसीलदार विद्याचरण कडवकर यांना निवेदन दिले होते. त्याच्यावर कारवाई न झाल्यामुळे झोपी गेलेल्या नगरपालिकेला जागी करण्यासाठी आज उबाठाचे शहरप्रमुख तथा माजी उपनगराध्यक्ष सदाशिव पाटील यांच्या नेतृत्वाखाली ढोल बजाव आंदोलन करण्यात आले.
सकाळी अकरा वाजता नगर परिषदे समोर व जुन्या तहसील समोर ढोल वाजून हा परिसर अक्षरशः दणदणून सोडला. रोडवर येणाऱ्या जाणाऱ्यांचे तोबा गर्दी झाली बऱ्याच वेळ ढोल वाजेत असल्यामुळे नगरपालिकेतील कर्मचारी गेटवर येऊन मुख्याधिकारी नंदकिशोर भोंबे यांच्या सूचने नुसार कार्यालयीन प्रमुख प्रशांत देशपांडे यांनी लेखी स्वरूपात पुढील काम करण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी शिवसेना शहर प्रमुख तथा माजी उपनगराध्यक्ष डॉ सदाशिव पाटील, उपतालुकाप्रमुख शिवाजी थेटे, सामाजिक कार्यकर्ते डॉ खालील पटेल, उपशहर प्रमुख चंद्रकांत लाडे, सलमान शेख, प्रकाश काचोळे, विभाग प्रमुख उदय सोनवणे, उपविभाग प्रमुख राजीव पवार, सामाजिक कार्यकर्ते गोकुळ राठोड, शेख अमुभाई, संतोष बनकर, पंकज चव्हाण, राज ठाकूर, सचिन गिरे, विकास खाजेकर, भोला पवार इत्यादी नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होते.
नगर परिषद वर प्रशासक असल्याने मुख्यधिकारी यांची सतत गैरहजेरी असल्याने स्वछता, पाणी प्रश्न, आदी विविध समस्या असल्याने ग्रामीण भागापेक्षा ही शहरातील जनतेची गैरसोय होत असल्याने नगर परिषद प्रशासनाला जागी करण्यासाठी ढोल बजाव आंदोलन करण्यात आले असल्याची माहिती उबाठा चे डॉ सदाशिव पाटील यांनी दिली.