Marathwada Graduates Constituency Election 2026 : मतदान केंद्राच्या १०० मीटर परिसरात मोबाईल बंदी

जिल्हाधिकारी गौडा यांचे आदेश, पदवीधर निवडणूक कामाचा घेतला आढावा
Marathwada Graduates Constituency Election 2026
मराठवाडा पदवीधर मतदार संघाच्या निवडणूक कामाचा आढवा घेताना जिल्हाधिकार विनय गौडा जीसी. सोबत जिल्हा परिषदच्या सीईओ मिन्न पीएम, अप्पर जिल्हाधिकारी संभाजी अडकुणे.pudhari photo
Published on: 
Updated on: 

छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूक जिल्ह्यात शांततापूर्ण, निर्भय आणि सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी विनय गौडा जीसी यांनी भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १६३ नुसार मनाई आदेश जारी केला आहे. त्यानुसार मतदान केंद्राच्या १०० मीटर परिसरात मोबाईलसह कॉडलेस फोन, लाऊडस्पिकर, मेगा फोन, मायक्रोफोन, वायरलेस सेट आणि शस्र वापरावर बंदी राहणार आहे.

यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्हू पी. एम., अपर जिल्हाधिकारी संभाजी अङकुणे, जिल्हा परिषदेचे अतिरिक मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळुंके, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) सविता चौधर यांच्यासह तहसीलदार संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. पदवीधर मतदार संघाच्या प्रक्रियेला मंगळवारपासून सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील निवडणुकीच्या कामकाजाचा जिल्हाधिकारी गौडा यांनी आढावा घेतला, त्यासोबतच काही सूचना आणि करावयाच्या सोयीसुविधा, मतदार केंद्राबाबतचे निर्देशही त्यांनी दिले.

Marathwada Graduates Constituency Election 2026
Vashu Bhagnani : आयकर विभागाच्या कारवाईचा धसका? प्रसिद्ध निर्माते वाशू भगनानी थेट लंडनमध्ये रुग्णालयात ॲडमिट!

या निवडणुकीच्या मतदान केंद्र परिसरात निवडणूक आयोगाने प्राधिकृत केलेले अधिकारी व निवडणूक कामाशी निगडित कर्मचारी व मतदान कक्षाबाहेर मतदानासाठी रांगेत उभे असलेले मतदार वगळून पाच किया त्यापेक्षा जास्त लोक येऊ नये, या आदेशात मतदान केंद्राच्या १०० मीटर परिसरात मोबाईल फोन वापरणे, त्याद्वारे केंद्रातील फोटो काढणे, चित्रीकरण करण्यास मनाई आहे. त्यासोबतच मतदान केंद्राच्या १०० मीटर परिसरात कोणत्याही प्रकारची शस्त्रे वापरणे परवानगी दिलेल्या वाहनांचाच वापर करणे, वाहनांद्वारे मतदारांची ने आण करणे, मतदान केंद्र परिसरात प्रचार करणे, मतदारांना धमकावणे, दबाव टाकणे, ज्वलनशील पदार्थ, स्फोटक पदार्थ, हत्यारे घेऊन आणे, यास मनाई करण्यात आली आहे.

मतदान केंद्रांवरील सुविधा

जिल्ह्यातील प्रत्येक मतदान केंद्राची तहसीलदारांनी प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक सोयी-सुविधांची खातरजमा करावी, दिव्यांग मतदारांसाठी रॅम्प, स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी, वीज तसेच अन्य आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध आहेत का, याची तपासणी करण्याचे आदेशही जिल्हाधिकारी गौडा यांनी दिले.

Marathwada Graduates Constituency Election 2026
ओव्हरहेड वायर तुटल्याने कोकण रेल्वे साडेतीन तास विस्कळीत

एका केंद्रावर ८५० मतदार

मराठवाडा पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी मतदान केंद्रांची यादी तयार करणे सुरू आहे. यात एका मतदान केंद्रावर सुमारे ८०० ते ८५० मतदार असतील, अशी शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे.

पदवीधरसाठी उमेदवारी दाखल करणे सुरू

पहिल्या दिवशी ३० अर्ज वितरित, दाखल एकही नाही

छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूक-२०२६ साठी उमेदवारी अर्जाचे वितरण व दाखल करण्याच्या प्रक्रियेला मंगळवारी (दि. २९) सुरुवात झाली. यात पहिल्याच दिवशी १९ इच्छुकांनी ३० अर्ज घेतली, परंतु, त्यापैकी एकानेही उमेदवारी दाखल केलेली नाही.

भारत निवडणूक आयोगाने जारी केलेल्या विधानपरिषद निवडणूकीच्या कार्यक्रमानुसार मंगळवारी (दि. २९) निवडणुकीची अधिसूचना विभागातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांसह जिल्हा परिषद, उपविभागीय अधिकारी, तहसील कार्यालये, पंचायत समित्या, नगरपरिषदा, नगरपालिका, ग्रामपंचायती तसेच शासकीय कार्यालयांमध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे. तसेच विभागीय आयुक्त कार्यालय आणि सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांच्या संकेतस्थळ आणि स्थानिक वर्तमानपत्रातूनही निवडणुकीची सूचना प्रसिद्ध केली आहे. त्यासोबतच उमेदवारी अर्ज वितरण व स्विकृतीची प्रक्रियाही सुरू झाली. ६ ऑक्टोबरपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहे. तर ७ ऑक्टोबर रोजी अर्जाची छाननी होणार असून, ९ ऑक्टोबरला उमेदवारी मागे घेण्याची अंतिम तारीख राहणार आहे.

२३ ऑक्टोबरला मतदान

मराठवाडा पदवीधर मतदारसंघासाठी २३ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ४ या वेळेत मतदान होणार आहे. तर २७ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया ३१ ऑक्टोबरपूर्वी पूर्ण होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news