Vashu Bhagnani : आयकर विभागाच्या कारवाईचा धसका? प्रसिद्ध निर्माते वाशू भगनानी थेट लंडनमध्ये रुग्णालयात ॲडमिट!

आर्थिक अनियमित व्यवहारप्रकरणी आयकर विभागाकडून सखोल चौकशी सुरू
Vashu Bhagnani hospitalized London
ज्येष्ठ चित्रपट निर्माते वाशू भगनानीPudhari
Published on: 
Updated on: 

Vashu Bhagnani hospitalized London : बॉलीवूड चित्रपट निर्माते वाशू भगनानी यांना लंडनमध्ये रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे; मात्र त्यांना रुग्णालयात दाखल करण्यामागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, असे वृत्त ANI ने दिले आहे. विशेष म्हणजे वाशू भगनानी आणि त्यांची सून, अभिनेत्री रकुल प्रीत सिंग यांच्याशी संबंधित १२ मालमत्तांवर आर्थिक विभागाने धाडी टाकल्याचे वृत्त आल्यानंतर काही दिवसांतच त्यांना प्रकृतीच्या समस्येचे वृत्त समोर आले आहे.

आयकर विभागाच्या १२ ठिकाणी धाडी

चित्रपट निर्मितीच्या नावाखाली परदेशात वळवल्या जाणाऱ्या कथित आर्थिक अनियमित व्यवहारप्रकरणी वाशू भगनानी आणि त्यांची सून, अभिनेत्री रकुल प्रीत सिंग यांच्याशी संबंधित १२ मालमत्तांवर आयकर विभागाने धाड टाकली. आयकर विभागाची अनेक पथके कागदपत्रे, आर्थिक नोंदी आणि कथित परदेशी व्यवहारांची तपासणी करत होती. तसेच कुमार मंगत यांच्या नेतृत्वाखालील 'पॅनोरामा स्टुडिओज'शी संबंधित ठिकाणांचीही झडती घेतली. दरम्यान, या कारवाईबाबत वाशू भगनानी किंवा रकुल प्रीत सिंग यांनी कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.

Vashu Bhagnani hospitalized London
Vishnu Bhagnani On David Dhawan: 'चुनरी चुनरी' गाण्यावरून विष्णू भगनानींचा डेव्हिड धवन यांच्यावर गंभीर आरोप; थेट कोर्टात धाव!

बॉलीवूडमधील प्रसिद्ध निर्मात्यांपैकी एक वाशू भगनानी

वाशू भगनानी हे बॉलीवूडमधील एक प्रसिद्ध निर्माते आहेत. त्यांनी १९९५ मध्ये 'पूजा एंटरटेनमेंट' स्थापन केली. याच वर्षी त्यांनी अभिनेता गोविंदाच्या 'कुली नंबर १' चित्रपटाची निर्मिती केली. यानंतर त्यांनी 'हिरो नंबर १', 'बीवी नंबर १', 'प्यार किया तो डरना क्या' आणि 'रहना है तेरे दिल में' यांसारख्या अनेक यशस्वी चित्रपटांची निर्मिती केली. मात्र यानंतर त्यांचे 'बडे मियाँ छोटे मियाँ' आणि 'बेल बॉटम' यांसारखे मोठे बजेट असलेले चित्रपट अपयशी ठरले.

Vashu Bhagnani hospitalized London
Rakul Preet Singh-Jackky Bhagnani Wedding : एक दुजे के लिए! गोव्यात पार पडले रकुल प्रीत सिंह-जॅकी भगनानीचे लग्न

मुलगा जॅकीही निर्मिती क्षेत्रात

वाशू यांचा मुलगा जॅकी भगनानी याने २००९ मध्ये 'कल किसने देखा' या चित्रपटातून अभिनेता म्हणून कारकिर्दीची सुरुवात केली. मात्र अनेक चित्रपट अयशस्वी ठरल्यानंतर त्यानेही चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात पाऊल टाकले. त्याने २०२४ मध्ये अभिनेत्री रकुल प्रीत सिंग हिच्याशी विवाह केला. कार्यालयाच्या जागेची विक्री केल्यानंतर 'पूजा एंटरटेनमेंट' मागील वर्षी पुन्हा एकदा चर्चेत आली होती. त्यावेळी अनेक कर्मचाऱ्यांनी त्यांचे अनेक महिन्यांचे पगार व इतर देणी दिली गेली नसल्याचा आरोप केला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news