

नितीन थोरात
वैजापूर : दोन दिवस लगातार सुरू असलेल्या पावसामुळे तालुक्यात अतिवृष्टी व ढगफुटीसदृश पावसाने हाहाकार माजवला आहे. शहरात अनेक घरे वाहून गेली आहेत शेतकऱ्यांची पाच जनावरे देखील वाहून गेले आहेत. भिवगाव, नारायणगावसह १२ गावं पुराच्या विळख्यात आली असून, कोट्यवधी रुपयांचे शेतीपिक व मालमत्तेचे नुकसान झाले आहे.
नारंगी धरणातून १६०० क्युसेक विसर्ग सुरू असून आणखी विसर्ग वाढण्याची शक्यता आहे. आतापर्यंत सुमारे शहरासह तालुक्यातील ४०० कुटुंबांना स्थलांतरित करण्यात आले आहे. दरम्यान, पालकमंत्री संजय शिरसाट व आमदार रमेश बोरणारे यांनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व नुकसान झालेल्या कुटुंबाशी संवाद साधून महिलेची बोलणे करून दिले.
शिंदे यांनी तिला मदतीची ग्वाही देत “घाबरू नका, आम्ही पाठीशी आहोत” असा दिलासा दिला. तर या दोघांनी मुख्यमंत्र्यांची देखील संवाद साधला. प्रशासनाकडून बचाव व मदतकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. तर डॉ.दिनेश परदेशी यांनी देखील गिरीश महाजनांशी संवाद साधून तालुक्यात हेलिकॉप्टरची मदत देण्याची मागणी केली.
शहरातील नारंगी नदीला पूर आल्याने चार जनावरे वाहून गेली.
नारायणपूर भागात ७२ तास पुरात अडकलेल्या 18 जणांना एनडीआरएफच्या टीमने सायंकाळपर्यंत सुरक्षितपणे बाहेर काढलं.
शेतीचा मोठ्या प्रमाणात नुकसान, शहरातील अनेक जण बेघर.
तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळख असणाऱ्या शिऊर गावाला पूर्णपणे पुराचा विळखा.
वैजापूर शहराला पानी पुरवठा करणारा नारंगी धरण शंभर टक्के भरले.
उपविभागीय अधिकारी डॉ. अरुण जऱ्हाड सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून तहसीलदार सुनील सावंत नदीकाठी तळ ठोकून. वैजापूर-वीरगाव पोलिस गस्त आणि बचाव कार्यात सक्रिय वैजापूर नगरपालिकेचे कर्मचारी देखील सतर्क. नागरिकांना सतत सूचना व मदतकार्य सुरू