Maratha Reservation Andolan : जिल्हयातून मुंबईतील आंदोलकांसाठी शिदोरी पाठविण्याचा ओघ सुरू

कन्नड, पैठण, गंगापूर, सिल्लोड तालुक्यांतील मराठा, ओबीसीसह इतर समाजबांधवांचा पुढाकार
Maratha Reservation Andolan
Maratha Reservation Andolan : जिल्हयातून मुंबईतील आंदोलकांसाठी शिदोरी पाठविण्याचा ओघ सुरू File Photo
Published on
Updated on

Maratha Reservation Andolan The district has started sending food parcels to the protesters in Mumbai

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा मुंबई येथील आझाद मैदानावर संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनात मराठा समाजबांधवांची खाण्या-पिण्या वाचून गैरसोय होऊ नये म्हणून कन्नड, सिल्लोड, पैठण, गंगापूर तालुक्यातून शिदोरी पाठविण्याचा ओघ सुरू झाला आहे. रविवारी मोठ्या प्रमाणात भाकरी, हिरवी मिरचीचा ठेचा, लोणचे, पाण्याचे बॉक्स आदी साहित्य घेऊन मराठा बांधव मुंबईकडे रवाना झाले आहे.

Maratha Reservation Andolan
Sambhajinagar News : भुयारी मार्ग दुचाकीस्वारांसाठी ठरतोय धोकादायक

कन्नड, तालुक्यातून मुंबईला शिदोरी रवाना

कन्नड मुंबई येथील आझाद मैदानावर संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनात मराठा समाजबांधवांची खाण्या-पिण्या वाचून गैरसोय होऊ नये तालुक्यातील खेड्यापाड्यांतील गावांतून आता शिदोरी पाठविण्याचा ओघ सुरू झाला आहे. म्हणून आझाद मैदान परिसरातील हॉटेल, खाऊ गल्ल्या बंद करण्यात आल्याने मराठा आंदोलकाची गैरसोय होत असल्याच्या बातम्या सोशल मीडियावर झळकल्याने गावागावांतून समाजबांधव आता मुंबईकडे आपल्या समाजबांधवांची गैरसोय होऊ नये म्हणून पुढे येत आहे. तालुक्यातील गावागावांत आता दवंडी देऊन पोळी, भाकरी, चटणी, लोणचे देण्याचे आहवान करण्यात येत असून, यास प्रचंड सहभाग मिळत आहे.

तालुक्यातील हतनूर, चिखलठाण, नाचनवेल, पिशोर, अंतापूर, आलापूर, केसापूर, कोप रवेल, वाकद, लोहगाव, खामगाव, कानडगाव, मुंगसापुर, तांदुळवाडी, चिवळी, गव्हाली, नांदरपूर, चिंचखेडा, विपखेडा, शेरोडी आदी गावांतून मोठ्या प्रमाणात पोळी, भाकरी, पाणी बॉटलची शिदोरी मुंबईला पाठविण्यात आली असून, उर्वरित गावांतून टप्प्याटप्प्याने शिदोरी पाठविण्याचे नियोजन सुरू झाले आहे. दररोज गावगावांतून शिदोरी पाठविण्याचा ओघ वाढणार असून, मुंबईला जाणाऱ्यांचीही संख्या वाढत आहे.

Maratha Reservation Andolan
Rudreshwar Ganesh Caves : तीन हजार वर्षांपूर्वींची गणेशमूर्ती

शिदोरीतून दिसतोय सामाजिक एकोपा... ग्रामीण भागात हरिनाम सप्ताहाचा समारोप असो की कोणतेही जयंती, उत्सवानिमित्त भंडारा असो यासाठी गावातील प्रत्येक परात पोळ्या बनविण्यासाठी गव्हाचे पीठ वाटप होते. तर महिलावर्ग तितक्याच धार्मिक भावनेतून त्या पिठ्याच्या पोळ्या करून पंगतीसाठी देण्याची परंपरा आहे. अगदी त्याचप्रमाणे गावातील महिलांनी पीठ न घेता घरातील पिठाच्या पोळ्या, भाकरी, ठेचा, बनवून गाडीजवळ स्वतः आणून देत आहेत. यात विशेष बाब म्हणजे ही शिदोरी फक्त मराठा समाजाबरोबर इतर सर्व समाजांतील असलेल्या घरांतून दिली जात असल्याने सामाजिक एकोप्याचे दर्शन घडत आहे. सध्या सोशल मीडियावर मराठा आंदोलनावरून काही राजकीय नेते, सामाजिक कार्यकत्यांकडून दोन समाज कसे एकमेकांविरुद्ध झुंजतील अशी बेताल व्यक्तव्य करताना दिसत असले तरी ग्रामीण भागातून मुंबईकडे निघालेल्या शिदोरीतून एक मोठी चपराक या लोकांना बसल्याशिवाय राहणार नाही.

कडेठाण येथून दहा हजार भाकरी, पन्नास किलो मिरचीचा ठेचा

कडेठाण मुंबई येथे आझाद मैदानावर चालू असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनातील समाज बांधवांच्या जेवणाची व्यवस्था व्हावी यासाठी पैठण तालुक्यातील कडेठाण बुद्रुक येथील समस्त गावांतील समाज बांधवांच्या वतीने दहा हजार ज्वारी व बाजरीच्या भाकरी व पन्नास किलोमिरचीचा ठेचा लोणचे तसेच तीळ, खोबरे जवस व शेंगदाण्याच्या चटण्या पाण्याचे बॉक्स व एक क्विटल चिवडा पाठवण्यात आला आहे.

मुंबई येथे हॉटेल खाऊ गल्ली बंद असल्याने समाज बांधवांची जे वणाची अडचण येत असल्याचे गावातील समाज बांधवांना सोशल मीडियावर समजले ही बातमी समजताच गावकरी सरसावले गावकऱ्यांनी निर्धार केला गरज पडल्यास जोपर्यंत आंदोलन सुरू राहील तोपर्यंत आपल्या बांधवांसाठी चटणी भाजी भाकरी पुरवण्याचा निर्णय घेतला रविवारी दुपारी तीन वाजता गावातील समाज बांधव मंगेश जाधव यांनी त्यांच्या स्वतःची पिकप ही मोफत दिली व ही भाजी भाकरी मुंबईला रवाना करण्यात आली.

गावातील महिलांचा मोठा सहभाग

या वेळी महिलांना एकमुखी निर्णय घेतला की गरज पडेल त्या त्या वेळी आम्ही भाकरी बनवण्यासाठी तयार आहोत चिंता करू नका, फक्त आवाज द्या. यावेळी महिलांनी ज्वारी आणि बाजरीची भाकरी चार ते पाच दिवस कशी टिकेल याची काळजी घेतली. या उपक्रमामुळे मराठा समाजाच्या आंदोलनाला ग्रामीण जनतेचा भक्कम पाठिंबा मिळत आहे.

सिल्लोड तालुक्यातून ८० आयशर ट्रक भरून शिदोरी

सिल्लोड एक घर एक शिद ोरीफ्फ या उपक्रमातून सिल्लोड तालुक्यातील मराठा बांधवांनी ऐतिहासिक एकजुटीचे दर्शन घडवले. मराठा संघर्षयोद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाला पाठबळ देण्यासाठी तालुक्यातील प्रत्येक गावातून, प्रत्येक घरातून शिदोरी पाठवण्यात आली.

या शिदोरीत बाजरी-ज्वारीच्या भाकऱ्या, पोळ्या, तिखट, पुरी, लोणचे, कांदा तसेच पिण्यासाठी शुद्ध पाण्याचे बॉक्सचाही यात समावेश आहे. दि.३१ ऑगस्ट २०२५ रोजी तब्बल ८० गावांमधून ८० ट्रॅक, आयशर भरून या शिदोरीचे प्रचंड प्रमाणात संकलन करण्यात आले. या माध्यमातून जवळपास पाच लाख आंदोलनकत्याँच्या एका वेळच्या जे यणाची व्यवस्था सिल्लोड तालुक्याच्या वतीने करण्यात आल्याची माहिती आयोजकांनी दिली. सिल्लोड तालुक्यातील मराठा समाज बांधवांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवून, आरक्षणासाठीचा लढा हा सर्वांचा आहेपफ, असा ठाम संदेश दिला. गावोगावी सकल मराठा समाजाने महिलांसह तरुणाई, ज्येष्ठ नागरिक, शेतकरी, व्यापारी या सर्व घटकांनी शिदोरी उभारण्यात आपला सक्रिय वाटा उचलला.

या निमित्ताने तालुक्यातील ऐक्य व बांधिलकीचे दर्शन घडले असून, आंदोलनस्थळी मोठ्या प्रमाणात अनछत्र उभारण्याचे प्रयत्न करण्यात आले आहेत. यातून मराठा बांधवांच्या लढ्याला पाठबळ देण्याचे काम सिल्लोड तालुक्याने केले आहे. दरम्यान मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद उभा राहतो का? असा प्रश्न निर्माण झालेला आहे. मात्र मराठा आंदोलकांच्या मदतीसाठी ओबीसी समाजाच्या तरुणांनी पुढे येत मदत केल्याचे चित्र या मदती दरम्यान दिसून आले.

पळशीतून सात क्विटलच्या पुऱ्या मुंबईला रवाना

तासाभरात नियोजन, महिलांचा मदतीचा हात अन् सात क्विटलच्या पालक पुऱ्या व एक विंवटल चिवडा मुंबईतील मराठा आंदोलकांसाठी रवाना, हे चित्र तालुक्यातील पळशी येथे रविवारी (दि. ३१) पाहायला मिळाले. अवघ्या आठ तासांत तरुण, महिलांच्या मदतीने हे सहज शक्य झाले, शिवाय यातून ग्रामस्थांची एकी दिसून आली. विशेष म्हणजे यासाठी ओबीसी समाजाचे तरुणही मदतीला धावून आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news