Maratha Morcha : मराठा मोर्चा मुंबईकडे, समाजबांधवांची प्रचंड गर्दी, आरक्षण घेऊनच परतण्याचा निर्धार

मराठा आरक्षणाच्या प्रलंबित मागण्यांसाठी मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या महामोर्चाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळात आहे.
Maratha Morcha
Maratha Morcha : मराठा मोर्चा मुंबईकडे, समाजबांधवांची प्रचंड गर्दी, आरक्षण घेऊनच परतण्याचा निर्धारFile Photo
Published on
Updated on

Maratha march towards Mumbai, huge crowd of community members

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा मराठा आरक्षणाच्या प्रलंबित मागण्यांसाठी मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या महामोर्चाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला असून, अंतरवाली सराटीतून बुधवारी (दि. २७) सकाळी साडेदहा वाजता मराठा समाजबांधव मुंबईच्या दिशेने निघाले. आरक्षण घेऊनच मुंबईतून परतण्याचा निर्धार मोर्चेकऱ्यांनी केला आहे.

Maratha Morcha
Chhatrapati Sambhajinagar Crime : वैजापुरात पेट्रोलपंप जाळण्याचा प्रयत्न

हा मोर्चा रात्री साडेअकराच्या सुमारास नगरजवळ पोहचला आहे. एकंदर पाहता त्यामुळे नियोजित जुन्नर येथे मुक्कामी पोहचण्यास मोर्चाला विलंब होणार आहे. शेवगाव येथे बोलताना जरांगे यांनी निर्णायक लढाई असून, समाजाने मोर्चात बहु संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन केले.

ढोल-ताशांच्या गजरात निघालेल्या मोर्चाचा ताफा वडीगोद्री फाटा येथे पोहोचला असता, गाड्यांचा आणि पायी चालणाऱ्या समाजबांधवांचा प्रचंड लोंढा पहायला सोलापूर-धुळे महामार्गाच्या डाव्या बाजूला दोन ते तीन किलोमीटरवर गाड्यांची अखंड रांग होती. अवघे दहा किलोमीटर अंतर पार करायला तब्बल तीन तास लागले. दुपारी दोनच्या सुमारास मोर्चा अंकुशनगर-कारखाना, शहागड येथे पोहोचला.

Maratha Morcha
Ganesh Chaturthi : डीजेचा दणदणाट झाला तर थेट कारवाईच - येथे करा तक्रार

या ठिकाणी मनोज जरांगे यांचे कुटुंबीयांनी त्यांचे औक्षण केले. त्यानंतर मोर्चा पैठण फाटा (खुटा चौक) येथे दाखल झाला, जिथे जनसागराने महामार्गाच्या दोन्ही बाजू भरून टाकल्या होत्या. गर्दी एवढी होती की, फक्त पैठण फाटा ओलांडायलाच अर्धा तास लागला. पैठण फाट्यावर जरांगे यांच्या स्वागतासाठी उंच क्रेनवर भला मोठा पुष्पहार सजवण्यात आला होता. पावणेचारच्या सुमारास मोच दाखाहे पिंपळगाव येथे झाला. येथे ढोल-ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीत मोर्चाचे भव्य स्वागत करण्यात आले. संपूर्ण गावकरी रस्त्याच्या दोन्ही बाजूने मोर्चाला अभिवादन करण्यासाठी उभे होते. या वेळी मनोज जरांगे यांनी गावातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. रात्री साडेआठ वाजता हा मोर्चा शेगाव येथे होता.

हा प्रश्न प्रतिष्ठेचा करायचा नाही: विखे-पाटील

मनोज जरांगेंच्या विनंतीनुसार, सरकारने शिंदे समितीला मुदतवाढ दिली. मात्र, त्यांचा मोर्चा निघाल्यापासून त्यांच्याशी चर्चा अजून नाही. शासनाला हा माला प्रतिष्ठेचा करायचा नाही. पूर्वीही केला नव्हता आणि आताही करायचा शासनाची भूमिका नाही, असे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी म्हटले आहे.

दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गणेशोत्सवासाठी आपल्या गावी जाण्याचा निर्णय रद्द केला असून जरांगे यांना त्यांनी चर्चेचे आवाहन केले आहे. मुंबईला न येण्याची सूचना त्यांनी के ली असल्याचे कळते.

सर्वसमावेशक मोर्चा

हजारोंचा मोर्चात हजारोंचा जनसमुदाय एकच नारा देत होता, तो म्हणजे पाटील-पाटील. तसेच तुमचं आमचं नात काय जय जिजाऊ जय शिवराय, मनोज जरांगे पाटील तुम आगे बढो हम आपके साथ हैं, आरक्षण देत कस नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, एकच मिशन मराठा आरक्षण, आरक्षण घेऊनच मुंबईतून पर-तणार या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. मोर्चामध्ये डॉक्टर, वकील, सरपंच, जिल्हा परिषद सदस्य असे गरीब श्रीमंत समाजबांधव सर्व समावेशक सहभाग दिसून आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news