Sambhajinagar News : लपवून ठेवलेले दहा ट्रक भांडी संच मंठा पोलिसांकडून जप्त

साहित्य पोलिसांच्या देखरेखीत पिंपरखेड येथील गोदामात सुरक्षित
Sambhajinagar News
Sambhajinagar News : लपवून ठेवलेले दहा ट्रक भांडी संच मंठा पोलिसांकडून जप्तFile Photo
Published on
Updated on

Mantha police seize ten truckloads of concealed utensil sets

मंठा, पुढारी वृत्तसेवा : बांधकाम कामगारांच्या कल्याणार्थ असलेल्या योजनांवर सर्रासपणे डल्ला मारण्याचे काम सरकारी अधिकारी आणि दलालांच्या माध्यमातून होत आहे. ही बाब भांडी संच परस्पर विक्री केलेच्या आरोपात तत्कालीन सरकारी कामगार अधिकाऱ्यांना परतूर पोलिसांनी अटक केल्याने उजेडात आली. ही घटना ताजीच असताना पुन्हा बुधवार, दि. १२ रोजी मंठा पोलिस ठाण्याच्या हद्दीत लपवून ठेवलेले भांडी संचाचे १० ट्रक पोलिसांनी जप्त केले. यातील साहित्य पिंपरखेड येथील एजन्सीच्या दोन गोदामात सुरक्षित ठेवण्यात आले आहेत.

Sambhajinagar News
Jalna News : जिल्ह्यासाठी ४.३५ कोटींचा निधी मंजूर !

दरम्यान, इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या कल्याणार्थ विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. त्याचाच एक भाग म्हणून घरगुती उपयोगाची भांडीसंच वाटप योजना आहे. मंठा पोलिस ठाण्याच्या हद्दीत घरगुती उपयोगाची भांडी व साहित्य असलेले दहा ट्रक चोरी करून लपवून ठेवण्यात आले होते. हे सर्व साहित्य पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेण्यात आले आहे.

शासनाच्या मान्यतेनुसार हे सर्व साहित्य पिंपरखेड येथील एजन्सीच्या दोन गोडाऊनमध्ये ठेवण्यात येणार आहे. संस्थेचे अध्यक्ष आतिश राठोड यांच्या निगराणीखाली हे साहित्य सुरक्षित ठेवण्यात आले आहे. या गोडाऊनला पोलिसांचे स्वतंत्र लॉक व सील राहणार असून, साहित्य गोडाऊनमध्ये सुपूर्द केल्यानंतर त्याच्या सुरक्षिततेची संपूर्ण जबाबदारी संबंधित एजन्सीची राहणार आहे.

Sambhajinagar News
Jalna News : नऊ जणांचे आजपासून आमरण उपोषण

मंठा तालुक्यातील जनतेच्या हक्काचे साहित्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आमदार बबनराव लोणीकर, मकरंद पाटील आणि पोलिस निरीक्षक पुरुषोत्तम देशमुख संयुक्त प्रयत्नातून ही मोहीम सुरू केली आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेने कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन करण्यात आले आहे.

भांडी जालन्याला जाऊ देणार नाही : आमदार लोणीकर

हे साहित्य मंठा तालुक्यातील जनतेसाठी मंजूर झालेले असल्याने ते जालन्याला नेण्याचा कोणताही प्रयत्न सहन केला जाणार नाही. हे भांडे जालन्याला जाऊ देणार नाही, अशी स्पष्ट भूमिका माजी मंत्री तथा आमदार बबनराव लोणीकर यांनी मांडली.

जप्त करण्यात आलेले भांडी संच सीसीटीव्हीच्या निगराणीत मंठा पोलिसांनी १० ट्रक घरगुती उपयोगी साहित्याचे १० ट्रक भांडी संच जप्त केले आहे. ते साहित्य पिंपरखेड येथील गोदामात सुरक्षित ठेवण्यात आले आहे. त्याला पोलिसांचे स्वतंत्र कुलूप व सील राहणार आहे. गोडाऊन परिसरात सीसीटीव्हीचा वॉच राहणार आहे. सुरक्षिततेची संपूर्ण जबाबदारी संबंधित एजन्सीची राहणार आहे.
- पुरुषोत्तम देशमुख, पोलिस निरीक्षक, मंठा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news