Sambhajinagar News : एक जिल्हा, एक नोंदणीतील गैरप्रकार थांबणार

शासनाचे नवे आदेश जारी; संशयास्पद व्यवहार रडारवर
Sambhajinagar News
Sambhajinagar News : एक जिल्हा, एक नोंदणीतील गैरप्रकार थांबणारfile photo
Published on: 
Updated on: 

Malpractices in the 'one district, one registration' system will come to an end

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यात अनेकांची गैरसोय टाळण्याच्या उद्देशाने शासनाने 'एक जिल्हा, एक नोंदणी' उपक्रमाची सुरूवात केली. परतु, काहींनी या निर्णयाचा देखील गैरफायदा घेत परतालुक्यातील एक-दोन नव्हे तर तब्बल दोनशे दस्त नोंदवीले. या घटनेनंतर आता शासनाने बेकायदेशिर दस्त नोंदणीला चाप बविण्याच्या उद्देशाने १२ ऑक्टोंबरला नवे आदेश जारी केले आहे. त्यानुसार असे दस्त नोंदविण्यापूर्वी त्याची तपासणी आणि खरच संबंधित कार्यालयात गैरसोय आहे का, याची शहानिशा सह दुय्यम निबंधकांकडून केल्यानंतरच इतर तालुक्यात नोंदणीस मंजूरी दिली जाणार आहे. त्याबाबत आदेशात नमुद केले आहे.

Sambhajinagar News
Sambhajinagar News : व्हेरॉक क्रिकेट स्पर्धा ६ डिसेंबरपासून एडीडीसीए मैदानावर

राज्य शासनाने नागरिकांच्या सोयीसाठी ३० एप्रिल २०२५ पासून 'एक जिल्हा, एक नोंदणी' उपक्रम सुरू केला. त्यानुसार जिल्ह्यातील मालमत्तेची खरेदी-विक्री कोणत्याही नोंदणी कार्यालयात करता येत होती. मात्र, या सुविधेचा गैरफायदा घेतल्याचे प्रकार समोर आले. छत्रपती संभाजीनगर शहरातील मालमत्तांची बेकायदेशीर नोंदणी सोयगावच्या कार्यालयात केली. त्यावरुन तत्कालीन प्रभारी दुय्यम निबंधक दीपक रावळकर यांना निलंबित केले होते.

याच पार्श्वभूमीवर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली २२ सप्टेंबर २०२६ रोजी झालेल्या बैठकीत गैरप्रकार रोखण्यासाठी उपाययोजनांचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार १२ ऑक्टोबर रोजी शासनाने परिपत्रक जारी केले.

Sambhajinagar News
Sukhna River : सुखना नदीत दूषित पाणी सोडणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करण्याचे आदेश

त्यानुसार एका तालुक्यातील मालमत्तेचा दस्त दुसऱ्या तालुक्यात नोंदविण्यापूर्वी त्या तालुक्यातील सह दुय्यम निबंधक आणि जेथे दस्त नोंदविण्यासाठी सादर केले जाईल, त्या तालुक्यातील सह दुय्यम निबंधकांनी चर्चा करणे, एकमेकांची सहमती झाल्यानंतर आणि दस्ताची तपासणी करणे, दोन दिवसांत सह जिल्हा निबंधकांकडे परवानगीसाठी पाठवावे. मालमत्तेचे बाजारमूल्य, मुद्रांक शुल्क आणि नोंदणी शुल्काची पडताळणी करण्याबरोबर शासकीय प्रकल्प, आरक्षण, रस्ता रुंदीकरण संपादन प्रस्ताव, वनक्षेत्र आणि अन् कायदेशीर बोजे तपासावे लागणार आहेत.

रेरा प्रकल्पांना सूट

रेरा नोंदणीकृत प्रकल्पांचे करारनामे व खरेदीखत तसेच बुक क्रमांक ३ व ४ मधील विनामोबदल्याच्या दस्तांना या नियमांतून सूट देण्यात आली आहे. परंतु, असे असले तरी प्रत्येक महिन्याच्या ५ तारखेला या दस्तनोंदणीचा अहवाल नोंदणी महानिरीक्षक कार्यालयाला सादर करावा लागणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news