

Major changes to traffic routes tomorrow due to Ganesh Visarjan
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर शहरात निघणाऱ्या श्री गणेश विसर्जन मिरवणुका सुरळीत पार पडाव्यात आणि नागरिकांची गैरसोय टळावी, यासाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात आले आहेत.
२५ सप्टेंबर रोजी सकाळी ०७:०० वाजेपासून मिरवणूक संपेपर्यंत शहरातील मुख्य आणि उपमार्गावर सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंदी असेल. पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांच्या आदेशानुसार वाहतूक शाखेचे सहायक आयुक्त सुभाष भुजंग यांनी आदेश जारी केले आहेत.
सिडको-हडको व टीव्ही सेंटर परिसर : बंद मार्ग
चिश्तिया चौक - अविष्कार चौक बजरंग चौक ते बळीराम पाटील शाळा चौक एन-७बस स्टॉप - पार्श्वनाथ चौक - एन-९/एम-२/एन-११ - जिजाऊ चौक - टी.व्ही. सेंटर चौक ते एन-१२ स्वर्ग हॉटेल जवळील विहीर व जिजाऊ चौक ते शरद टी.
चांदणे चौक, जिल्हाधिकारी कार्यालय ते टी.व्ही. सेंटर रस्ता.
एन-१ चौक ते चिश्तिया चौक आणि सेंट्रल जकात नाका.
आझाद चौक ते बजरंग चौक.
सेव्हन हिल ते शिवाजीनगर, त्रिमुर्ती चौक ते गजानन महाराज मंदिर.
जुने शहर - 'हे' मुख्य मार्ग वाहतुकीसाठी बंद राहतील
राजाबाजार.
निजामोद्दीन दर्गा रोड ते निजामोद्दीन चौक व शहागंज चमन.
मुख्य मिरवणूक मार्गः संस्थान गणपती ते गांधी पुतळा, सिटी चौक, गुलमंडी, बाराभाई ताजिया, बळवंत वाचनालय, एस. बी. कॉलेज मार्गे जिल्हा परिषद मैदान.
संस्थान गणपती ते शहागंज चमन, गांधी पुतळा, सिटी चौक, जुना बाजार मार्गे भडकल गेट.
चेलीपुरा चौक, मंजूरपुरा चौक ते गांधी पुतळा.
लोटाकारंजा ते सराफा रोड, रोहिला गल्ली ते सराफा रोड.
जिन्सी चौक ते संस्थान गणपती, जाफरगेट-मोंढा ते
कामाक्षी लॉज ते सिटी चौक, गुलमंडी, पैठणगेट परिसरातील पूर्व-पश्चिम गल्ल्या बुढीलाईन, जुने तहसील कार्यालय, जुना बाजार, बारुदगरनाला.
सिल्लेखाना चौक, पैठणगेट, रंगारगल्ली, सिटी चौक.
सावरकर चौक, एम. पी. लॉ कॉलेज, महात्मा फुले पुतळा चौक.
अंजली टॉकीज, महात्मा फुले चौक, रॉक्सी कॉर्नर ते बाबुराव काळे चौक.
सिडको-हडको परिसरासाठी पर्यायी मार्ग
एन-१ व टी.व्ही. सेंटरकडे जाण्यासाठी: मणियार चौक, द्वारकादास शामकुमार, जीएसटी कार्यालय, व्हीआयपी मराठा हॉटेल मार्गे अथवा सेव्हन हिल, हायकोर्ट सिसल, जळगाव टी-पॉइंट, हर्शल टी मार्गे.
जिल्हाधिकारी कार्यालय ते टी. व्ही. सेंटर: उद्धवराव पाटील चौक, हडको कॉर्नर मार्गे.
गजानन महाराज मंदिर परिसरः हिंदू राष्ट्र चौक, विजयनगर, रिलायन्स मॉल मार्गे किंवा माणिक हॉस्पिटल व हेडगेवार हॉस्पिटलच्या मागच्या रस्त्याने वाहतूक वळवण्यात आली आहे.
जुन्या शहरासाठी पर्यायी मार्ग
रोशनगेट ते शहागंज :
चेलीपुरा चौक, लोटा कारंजा, सिटी चौक मागच्या रस्त्याने वाहतूक सुरू राहील.
मिलकॉर्नर ते औरंगपुरा : अंजली टॉकीजकडून नागेश्वरवाडी, डॉ. खनाळे हॉस्पिटल, निराला बाजार, समर्थनगर मार्गे अथवा खडकेश्वर मनपा मार्गे.
क्रांती चौक ते बस स्थानक :
सिल्लेखाना चौक व समर्थनगर चौक मार्गे.