प्रा. लोंढे हत्या प्रकरणातील मुख्य आरोपींची रवानगी न्यायालयीन कोठडीत

मोबाईल नष्ट करणाऱ्याच्या पोलिस कोठडीत २८ मार्चपर्यंत वाढ
sambhajinagar news
प्रा. लोंढे हत्या प्रकरणातील मुख्य आरोपींची रवानगी न्यायालयीन कोठडीतfile photo
Published on
Updated on

Main Accused in Prof. Londhe Murder Case Sent to Judicial Custody

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा :

शहरभर गाजलेल्या निवृत्त प्राध्यापक राजाभाऊ लोंढे हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी विशाल राठोड आणि करण आडे यांची पोलिस कोठडी संपल्याने त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. दुसरीकडे, लोंढे यांचा मोबाईल पुण्यात नेऊन पुरावा नष्ट करणारा आरोपी अक्षय शेटे याच्या पोलिस कोठडीत न्यायालयाने २८ मार्चपर्यंत वाढ केली आहे. बुधवारी (दि.२५) या तिन्ही आरोपींना जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. आर. उबाळे यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले होते.

sambhajinagar news
Rajabhau Londhe murder case : रिल स्टार तरुणीसोबत २५ लाखांचा व्यवहार

शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे निवृत्त प्रा. लोंढे यांची ५ ते ७ फेब्रुवारीदरम्यान डोक्यात गोळी झाडून हत्या करून विशालने त्यांचा मृतदेह गेवराई तांडा येथील डोंगरात पुरला होता. कोणालाही संशय येऊ नये यासाठी मृताचा मोबाईल स्वतःकडे ठेवला आणि बनाव रचला.

विशालने सुरुवातीला दर्गा परिसरातून स्वतःच्या मोबाईलवर लोंढे यांच्या मोबाइलवरून कॉल करून १५ सेकंदांचे संभाषण केले. त्यानंतर, लोंढे जिवंत असल्याचा भास निर्माण करण्यासाठी त्याने मित्र अक्षय शेटेच्या मदतीने लोंढे यांचा मोबाईल पुण्यात सुरू केला. तेथून मी कामात व्यस्त आहे, असे लोंढे यांच्या व्हॉट्सअॅप स्टेट्स ठेवण्यात आले.

sambhajinagar news
Sambhajinagar Crime: आधी प्राधापकाची हत्या, मग आरोपीचा पोलीस ठाण्यातच वावर; संभाजीनगर पोलिसांच्या निष्काळजीपणा उघड

मुठा नदीत फेकला मोबाईल

स्टेटस अपडेट केल्यानंतर अक्षयने आपल्या मावस भावाच्या मदतीने तो मोबाईल पुण्याच्या मुठा नदीच्या पात्रात फेकून दिला. सहायक पोलिस आयुक्त अशोक राजपूत यांच्या पथकाने स्थानिक अग्निशमन दल आणि ६ स्विमर्सच्या मदतीने नदीत मोबाईल शोधण्याचा प्रयत्न केला, मात्र अद्याप तो हाती लागलेला नाही. मोबाईलचा शोध घेण्यासाठी आणि या गुन्ह्यात सहभागी असलेल्या अक्षयच्या मावस भावाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी अक्षयच्या कोठडीची मागणी केली होती.

पश्चातापाचा लवलेशही नाही

सोशल मीडियावर रील स्टार म्हणून मिरवणारा मुख्य आरोपी विशाल राठोड याचा तोरा ११ दिवसांच्या पोलिस कोठडीनंतरही तसाच कायम असल्याचे दिसून आले. न्यायालयात हजर करताना त्याच्या चेहऱ्यावर कृत्याचा कोणताही पश्चाताप दिसत नव्हता. विशेष म्हणजे, सुनावणीदरम्यान त्याला पाहण्यासाठी त्याच्या समर्थकांनी न्यायालय परिसरात मोठी गर्दी केली होती, मात्र विशाल प्रचंड तोऱ्यात वावरताना दिसून आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news