Chatrapati Sambhajinagar Crime : मादणी येथे धारदार शस्त्राने हल्ला; एक जखमी

अजिंठा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
Chatrapati Sambhajinagar Crime News
मादणी येथे धारदार शस्त्राने हल्ला; एक जखमीFile Photo
Published on
Updated on

अजिंठा : सिल्लोड तालुक्यातील मादणी येथे सोमवारी (दि. 09) सायंकाळी सुमारे 8:33 वाजण्याच्या सुमारास किराणा दुकानासमोर एका व्यक्तीवर धारदार शस्त्राने हल्ला झाल्याची घटना घडली. या प्रकरणी अंकुश पंडित निकम (रा. मादणी, ता. सिल्लोड) याच्याविरुद्ध अजिंठा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी संदीप शेषराव कालभिले (34 वर्ष, रा. मादणी, ता. सिल्लोड) हे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतील विजयी मिरवणूक संपवून गावातील ज्ञानेश्वर कानडजे यांच्या किराणा दुकानासमोर उभे होते. त्यावेळी आरोपी अंकुश निकम याने कोणतेही कारण नसताना त्यांना ढकलाढकली करून हातातील धारदार शस्त्राने डाव्या हाताच्या दंडावर तसेच अंगठ्याजवळ वार केला. या हल्ल्यात कालभिले जखमी झाले.

Chatrapati Sambhajinagar Crime News
Farmers protest against MSEDCL : महावितरणविरोधात शेतकऱ्यांचा उद्रेक

घटनेनंतर ग्रामस्थांनी जखमी संदीप कालभिले यांना तत्काळ अजिंठा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथील प्राथमिक उपचारांनंतर पुढील उपचारासाठी त्यांना जिल्हा रुग्णालय घाटी येथे दाखल केले आहे.

अजिंठा पोलिसांत गुन्हा दाखल

उपचारानंतर संदीप कालभिले यांनी मंगळवारी (दि. 10) सायंकाळी अजिंठा पोलिस ठाण्यात आरोपी अंकुश पंडित निकम याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी संबंधित कलमान्वये गुन्हा नोंदविला असून तपास सपोनी अमोल ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल संदीप कोथलकर करीत आहेत.

Chatrapati Sambhajinagar Crime News
Tur dal price hike : कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीला 8,480 रुपयांचा उच्चांक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news