Lumpy Disease : दीड महिन्यात लम्पीने चोवीस जनावरे दगावली

कान्हेगाव, तर चिंचोली, हिवरा, सोनारी, बोधेगाव, लिला जाहागिर, आदी गावांच्या परिसरात लम्पी आजाराची लक्षणे दिसत आहे.
Lumpy Disease
Lumpy Disease : दीड महिन्यात लम्पीने चोवीस जनावरे दगावली File Photo
Published on
Updated on

Lumpy Disease: Lumpy killed twenty-four animals in one and a half months

बाबरा, पुढारी वृत्तसेवा : फुलंब्री तालुक्यातील बावरा, बाभुळगाव (खुर्द) या दोन गावांत लम्पी आज-ाराने एक ते दीड महिन्यात लहान मोठे तब्बल चोवीस जनावरे दगावल्याने पशुपालकांचे मोठे नुकसान झाले आहे.

Lumpy Disease
Sambhajinagar News : एसटी कर्मचाऱ्यांच्या सजगतेने वाचवले दोन लहान मुलांचे भविष्य

कान्हेगाव, तर चिंचोली, हिवरा, सोनारी, बोधेगाव, लिला जाहागिर, आदी गावांच्या परिसरात लम्पी आजाराची लक्षणे दिसत आहे. याबाबत पशुपालकांनी पशुवैद्यकीय विभागाकडे तक्रारी करून पशुवैद्यकीय अधिकाऱ्याची मदत पशुपालकांना न मिळाल्याने लाखो रुपयांचे पशुधन दगावले. यामध्ये दुभत्या गायी, बैलजोडी, लहान वासरांचा समावेश आहे. दुसरीकडे अतिवृष्टीच्या पावसाने शेतकऱ्याचे कंबरडे मोडले आहे, शेतकरी दोन्ही बाजूने आर्थिक अडचणीत सापडला आहे. शासनाने मदत जाहीर करावी, अशी मागणी बाबरासह परिसरातील शेतकरी वर्गातून होत आहे.

Lumpy Disease
संभाजीनगर विभागात ४ हजारांहून अधिक शालार्थ आयडी मंजूर

दरम्यान परिसरातील पशुवैद्यकीय दवाखान्यात वैद्यकीय अधिकाऱ्यासह विविध पदे रिक्त असल्याने पशुपालकांच्या जनावरांना वेळेवर उपचार न मिळाल्याने दीड महिन्यात तब्बल चोवीस जनावरे दगावली आहेत. तसेच अनेक जनावरांने लम्पी आजाराने ग्रस्त असल्याने पशुपालकांमध्ये भीती पसरली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news